google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 दुर्दैवी घटना! मंगळवेढ्यातील तरूण कामगाराचा ऊसतोडणी प्रसंगी ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने मृत्यू

Breaking News

दुर्दैवी घटना! मंगळवेढ्यातील तरूण कामगाराचा ऊसतोडणी प्रसंगी ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने मृत्यू

 दुर्दैवी घटना!  मंगळवेढ्यातील तरूण कामगाराचा ऊसतोडणी प्रसंगी ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने  मृत्यू 


       सोलापूर :- इब्राहिमपूर (ता.अक्कलकोट) शिवारातील शेतात ऊसतोड करणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला

 ओंकार चंद्रकांत शिंदे (रा.सलगर बुद्रुक ता.मंगळवेढा) असे मयताचे नाव आहे.

याबाबत दक्षिण पोलिस ठाणे अक्कलकोट येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्कलकोट तालुक्यातील इब्राहिमपूर येथे गुरुशांत बसण्णा टोणे (रा.इव्रामहिमपूर) यांच्या शेतात व्ही.पी. शुगरच्या वतीने ऊस तोडणी चालू होती. ही तोडणी मशीनच्या द्वारे करण्यात येत होती. ओंकार शिंदे हा ऊसतोड मशीन व सोबतच्या ट्रॅक्टरची देखभाल ओंकार शिंदे करण्याचे काम करत होता.

शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास ऊसतोड सुरू असताना चालकाच्या हलगर्जीपणामुळे ट्रॅक्टरचा चाक ओंकार यांच्या पोटावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला.

त्यास उपचारांकरिता अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालय येथे आणले असता डॉक्टरांनी तपासणीपूर्वी मृत झाल्याचे घोषित केले.

त्याच्या मागे आई- वडील, एक भाऊ असा परिवार आहे. या घटनेबाबत दक्षिण पोलिस ठाणे येथे शेतमालक गुरुशांत टोणे यांनी फिर्याद दिली. महादेव कोंडिबा लोखंडे (रा.मारोळी ता. मंगळवेढा) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Post a Comment

0 Comments