सह्याद्री प्रतिष्ठान वतीने आयोजित किल्ला स्पर्धेचा आज बक्षीस वितरण सोहळा येसाजी कंक यांचे चौदावे वंशज सरसेनापती सिध्दार्थ कंक उपस्थित राहणार
सांगोला (प्रतिनिधी):- सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सांगोला विभाग यांच्यावतीने प्रति वर्षाप्रमाणे भव्य किल्ला बांधणी, सजावट स्पर्धांचे २०२३ आयोजन करण्यात आले होते.
दिवाळी सुट्टीत लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा , इतिहासाविषयी माहिती व्हावी यासाठी किल्ले स्पर्धांचे आयोजन करण्यात आले
या स्पर्धेत शहरातील तब्बल ७५ पेक्षा जास्त स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. या किल्ले स्पर्धांचे बक्षीस वितरण आज शनिवार दि.२५ नोव्हेंबर रोजी हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती सरनौबत येसाजी कंक यांचे थेट
चौदावे वंशज सरसेनापती सिद्धार्थ कंक यांच्या शूभहस्ते, भाजपाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष चेतनसिंह उर्फ बाळासाहेब केदार व बक्षीसदाते यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
सदर कार्यक्रम ज्योतिर्लिग मल्टीपर्पज हॉल वाढेगाव नाका, सांगोला येथे सायं. ४ ते ६ या वेळेत होणार आहे.
सन्मानचिन्ह, रोख बक्षीस तसेच प्रत्येक स्पर्धकास सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमास सर्व सहभागी स्पर्धकांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन दुर्गसेवक अविनाश पोफळे यांनी केले आहे.
0 Comments