पत्रकार उमेश मंडले यांची जय मल्हार क्रांती संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी फेर निवड निवड !
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
फलटण/प्रतिनिधी ; दि.२६ नोव्हेंबर रोजी जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते दौलतनाना उमाजी शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली व उपाध्यक्ष अंकुशराव जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली
सस्तेवाडी ता.फलटण जि.सातारा येथे पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मंडलेवस्ती,सांगोला जि.सोलापूर येथील सांगोला प्रहार न्युज पोर्टलचे संपादक,
पत्रकार उमेश मंडले यांची सोलापूर जिल्हा (दक्षिण) अध्यक्ष म्हणून फेर निवड करण्यात आली.जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांच्या
हस्ते पत्रकार उमेश मंडले यांना निवडीचे पत्र देवून गौरविण्यात आले.पत्रकार उमेश मंडले यांनी पत्रकारीतेच्या व संघटनेच्या माध्यमातून गेल्या १० वर्षांपासून मोठे संघटन उभे करून चांगल्याप्रकारे काम केल्यामुळे त्यांची
जय मल्हार क्रांती संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष (दक्षिण) म्हणून फेरनिवड. करण्यात आली आहे.पत्रकार उमेश मंडले हे दौलत नाना शितोळे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात.
संघटनेच्या स्थापनेपासून दौलत नाना शितोळे यांच्यासोबत राहून समाज संघटीत करून समाजातील गोरगरीब कुटुंबाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
जय मल्हार क्रांती संघटनेच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी असताना झालेल्या माढा लोकसभेच्या निवडणुकीत उभे असलेले अपक्ष उमेदवार दौलत नाना शितोळे यांचा निवडणूक प्रतिनिधी म्हणून पत्रकार उमेश मंडले यांना बहुमान मिळाला होता.
0 Comments