शहीद अशोक कामटे संघटनेचे कार्य आदर्शवत - डॉ. प्रभाकर माळी _
शहीद दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरामध्ये 107 रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान_
सांगोला( प्रतिनिधी) (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला शहरात सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या शहीद अशोक कामटे संघटनेतर्फे शहीद दिनानिमित्त आयोजित
रक्तदान शिबिरामध्ये 107 रक्तदात्यांनी रक्तदान करून शहिदांना आदरांजली अर्पण केली. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉ. गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी
सूतगिरणीचे चेअरमन डॉ.प्रभाकर माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच कॅप्टन केशव लेंडवे, मेजर उत्तम काका चौगुले, कॅप्टन शिवाजी लवटे, मेजर रामचंद्र काशीद, मेजर भाऊसाहेब निमग्रे, मेजर मच्छिंद्र माने ,
आदर्श शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती कौशल्यादेवी शिंदे मॅडम, प्रमिला जगदाळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी सांगोला तालुका माजी सैनिक कल्याणकारी संघटनेचे सर्व सदस्य उपस्थित होते.
या सर्व सदस्यांनी संघटनेच्या कार्याचे कौतुक करून संघटनेला भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. गणपतराव देशमुख शेतकरी
सहकारी सूतगिरणीचे चेअरमन डॉ.प्रभाकर माळी यांनी संघटनेच्या स्थापनेपासूनच्या कार्याचा उल्लेख करत संघटनेच्या कार्याचे कौतुक केले तसेच संघटनेने सलग पंधरा वर्षे राबवलेल्या
या रक्तदान शिबिराचे देखील आवर्जून उल्लेख केला व संघटना वेळोवेळी नागरी समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेत असते त्याचा देखील आवर्जून उल्लेख केला.
यामध्ये प्रामुख्याने रेल्वे संबंधीच्या समस्या सोडण्यासाठी संघटनेने घेतलेली आक्रमक भूमिका तसेच सांगोला परिसरामध्ये नागरिकांना नगरपालिकेच्या संबंधित येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी संघटनेचे असलेली
भूमिका या भूमिकांचं स्वागत करत संघटनेच्या कार्याचा गौरव केला व संघटनेचे कार्य खरोखरच इतर सामाजिक संघटनांसाठी एक आदर्शवत कार्य असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.
सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत या रक्तदान शिबिरामध्ये विविध मान्यवरांनी भेट देऊन संघटनेच्या या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉ.बाबासाहेब देशमुख,
डॉ.अनिकेत देशमुख, सांगोला नगरपालिकेचे नगरसेवक तथा गटनेते सचिन लोखंडे, संभाजी ब्रिगेडचे राज्याचे नेते अरविंद केदार, संगोला नगरपालिकेच्या नगरसेविका अनुराधा खडतरे, दादासाहेब खडतरे,
महिला शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या उपाध्यक्ष कल्पनाताई शिंगाडे व सर्व संचालक मंडळ, सांगोला रेल्वे स्टेशनचे रेल्वे स्टेशन मास्तर श्री. गंगाकुमार सिंह, सांगोला नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष
सुरेश आप्पा माळी, नगरसेवक आनंद घोंगडे ,सामाजिक कार्यकर्ते बाबुराव खंदारे ,कै. वामनराव शिंदे आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. रमेश पवार, रावसाहेब सावंत गुरुजी,
श्री. डोंबे गुरुजी, माजी नगरसेवक किशोर बनसोडे, नवनाथ शिंदे सर, अजिंक्यतारा उद्योग समूहाचे प्रमुख श्री. गिरीश भाऊ नष्टे, सुशांत गावडे, डॉ.जगताप, मुकुंद हजारे, अँड. सचिन ढेरे हे मान्यवर उपस्थित होते.
सायंकाळी पाच वाजता कार्यक्रमाची सांगता शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली यावेळी कारगिल युद्धामधील जखमी जवान कॅप्टन भाऊसाहेब लिगाडे,
सुभिक्षा मोबाईल शॉपी चे मालक प्रतापसिंह इंगोले, माजी नगरसेवक किशोर बनसोडे, श्री. मकरंद अंकलगी सर हे उपस्थित होते यावेळी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा प्रसाद खडतरे आभार प्रदर्शन नीलकंठ शिंदे सर यांनी मानले सूत्रसंचालन संतोष कुंभार सर यांनी केले .कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 Comments