धक्कादायक... आई मुलाला जेवण घालत असतानाच जागेच्या वादातून माय-लेकाची
भरधाव कार अंगावर घालून शेजारील महिलेसह तिच्या अडीच वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या
घराच्या जागेच्या वादातून भरधाव कार अंगावर घालून शेजारील महिलेसह तिच्या अडीच वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली.
शितल अजित येणारे (वय २७) स्वराज्य येणारे (वय अडीच वर्ष) अशी मृत मायलेकांची नावे आहेत. गुरुवारी दि. २३ नोव्हेंबर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पारनेर शहरातील कुंभारगल्ली मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला
याप्रकरणी पोलिसांनी मृत महिलेची सासू चंद्रकला शिवाजी येणारे यांच्या फिर्यादीवरून किरण राजाराम श्रीमंदिलकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
श्रीमंदिलकर व येणारे कुटुंब शेजारी शेजारी राहतात. घरा शेजारच्या जागेच्या मोजणीतून दोन्ही कुटुंबात वाद होता. किरण श्रीमंदिलकर हा येणारे कुटुंबीयांना नेहमी जिवे मारण्याचे धमकी देत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास घरासमोरच्या जागेत शितल आपला अडीच वर्षाचा मुलगा स्वराज्य ला जेवण भरवत होत्या. त्याचवेळी आरोपी किरणने भरधाव कार एम एच १२ आर टी २७७७ शितल स्वराज यांच्या अंगावर घातली.
मोठा आवाज झाल्याने शितलच्या सासू चंद्रकला घराबाहेर आल्या. तर त्यांना कारखाली शीतल व स्वराज रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. किरण चालकाच्या सीटवर बसला होता
आवाज ऐकून परिसरातील लोक जमा झाले. त्यांनी जखमी शीतल व स्वराज्य यांना गाडी खालून बाहेर काढून खाजगी रुग्णाला हालवले पण प्रकृती गंभीर असल्याने तेथील डॉक्टरांनी नगरला हलवण्याचा सल्ला देण्यात आला
त्यानुसार शीततला नगर येथील शासकीय रुग्णालयात तर स्वराज्याला विळद येथील विखे पाटील रुग्णालय दाखल करण्यात आले उपचारादरम्यान शीतल गुरुवारी रात्री नऊ वाजता तर स्वराज्याचा मध्यरात्री एक वाजता मृत्यू झाला.
शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याची सुमारास पारनेर येथील स्मशान भूमी दोन्ही माय लेकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. अंत्यविधीनंतर मोठा जमाव पोलीस ठाण्यात दाखल झाला.
आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली फिर्यादी चंद्रकला यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते म्हणून मजुरी करून त्यांनी मुलाला वाढवले त्यांचा मुलगा अजित हा शहरात मासे विक्रीचा व्यवसाय करतो.
शितल ही पतीला व्यवसायात मदत करीत होती. मोल मजूरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील मायलेकांची हत्या झाल्याने शहरात संताप व्यक्त होत आहे. चिमुरड्या स्वराजच्या हत्तेने हळहळ व्यक्त होत आहे.
0 Comments