सांगोला तालुक्यात चोरट्यांनी फोडले जवळा ग्रामपंचायत; २९ हजारांचा मुद्देमाल लंपास
सांगोला : अज्ञात इसमाने ग्रामपंचायत
कार्यालयाचे दरवाजाचे कुलूप तोडून आत मध्ये प्रवेश करुन लाकडी टेबल, एक खुर्ची, सीसीटीव्हीचा डिव्हीआर असा २९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पळवून नेला. ही घटना जवळा (सांगोला) येथे घडली.
जवळा ग्रामपंचायतील १० हजार रुपये किंमतीचा लाकडी टेबल, १० हजार रुपये किमतीची व्हील खुचीं, ९ हजार रुपये किंमतीचा सीसीटीव्हीचा डिव्हीआर आदी, साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केले.
चोरीची फिर्याद ग्रामसेवत दत्तात्रय रसाळ यांनी दिली आहे. ग्रामसेवक रसाळ हे दि. २४ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ४.३० वाजताग्रामपंचायत कार्यालय बंद करुन गावी गेलेले होते.
दि. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.१५ वाजता ग्रामपंचायतचे शिपाई जयश्री वासते यांचा मुलगा समायान वासते याने जवळा ग्रामपंचायत कार्यालयाचे फोडल्याचे सांगितले.
दरम्यान, स्वतः ग्रामसेवक रसाळ आणि पोलीस पाटील यांनी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन सदरच्या घटनेची माहिती घेतली. त्यावेळी लाकडी टेबल, व्हिल खुर्ची, सीसीटीव्ही डिव्हीआर चोरीस गेल्याचे त्यांना दिसून आले. घटनेचा तपास सांगोला पोलीस करीत आहेत.
0 Comments