google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक प्रकार...सोलापुरात शिकाऊ डॉक्टरने रेल्वेसमोर मारली उडी, शरीराचे झाले दोन तुकडे

Breaking News

धक्कादायक प्रकार...सोलापुरात शिकाऊ डॉक्टरने रेल्वेसमोर मारली उडी, शरीराचे झाले दोन तुकडे

धक्कादायक प्रकार...सोलापुरात शिकाऊ डॉक्टरने रेल्वेसमोर मारली उडी, शरीराचे झाले दोन तुकडे


सोलापूरमध्ये शिकाऊ डॉक्टरने रेल्वेसमोर उडी मारत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडलीय. डॉक्टरने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आलेलं नाही.तो वैद्यकीय महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकत होता.

 सचिन चौधरी असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. रेल्वेसमोर उडी घेतल्यानंतर रेल्वे त्याच्या अंगावरून गेली. यामुळे तरुणाच्या शरीराचे दोन तुकडे झाले.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, होडगी येथील रेल्वे रुळावर सचिन चौधरी याने उडी घेऊन रेल्वेसमोर आत्महत्या केली. रेल्वेची जोरदार धडक झाल्यामुळे सचिनच्या शरीराचे दोन तुकडे झाले. 

सचिनच्या आत्महत्येचे कारण अद्यापही समजू शकले नाही. शिकाऊ डॉक्टरने अशा प्रकारची आत्महत्या केल्यामुळे सोलापुरात खळबळ उडाली आहे.

सचिन चौधरी हा मूळचा छत्रपती संभाजीनगर येथील असून सोलापुरातील खाजगी वैद्यकीय महाविद्यालय एमबीबीएसचे शिक्षण घेत होता. सचिनचे वडील श्रीमंत चौधरी छत्रपती संभाजीनगर येथे शेती करतात. सचिनने मित्राची बाईक घेतली. 

शहरा जवळ असलेल्या होटगी गावा जवळ जाऊन त्याने धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला. वळसंग पोलिसांनी पंचनामा करुन दोन तुकडे झालेला सचिनचा मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठवला.

Post a Comment

0 Comments