google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक प्रकार...भावजीने मेहुण्याच्या डोक्यात घातला कोयता सोलापूर जिल्ह्यातील घटना...

Breaking News

धक्कादायक प्रकार...भावजीने मेहुण्याच्या डोक्यात घातला कोयता सोलापूर जिल्ह्यातील घटना...

धक्कादायक प्रकार...भावजीने मेहुण्याच्या डोक्यात घातला कोयता सोलापूर जिल्ह्यातील घटना...


सोलापूर (प्रतिनिधी) वादाबाबत विचारलेल्या कारणावरून चिडून जाऊन भावजीने मेहुण्याच्या डोक्यात कोयता घालून मारहाण करत दुखापत केल्याची 

घटना १९ नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास गांधीनगर अक्कलकोट रोड येथे घडली. 

याप्रकरणी अरुण हनुमंतु गाजुल (वय-३६,रा.गोदुताई नवीन विडी घरकुल) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

 त्यांच्या फिर्यादीवरून श्रीकांत रामकृष्ण गुंड (वय-३०,रा. गांधीनगर,अक्कलकोट रोड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

फिर्यादी यांचे भावजी श्रीकांत गुंड यांच्या घरी जाऊन मी तुमचे काय वाईट केले आहे, माझ्यामुळे तुम्हाला काय त्रास होतोय, 

माझी बहीण रूपा हिला वारंवार त्रास का देता असे बोलून का वाद घालता असे विचारल्याच्या कारणावरून भावजीने चिडून जाऊन मेहुणा अरुण यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली.

 त्यानंतर कोयत्याने डोक्यात मारून दुखापत केली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास पोलीस हवालदार पवार हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments