ब्रेकिंग न्यूज...सांगोला भूमि अभिलेख कडील भ्रष्ट भूमापक योगेश पाटीलची बदली व विभागीय चौकशीचे आदेश
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला/प्रतिनिधी ; "दाम करी काम" या उक्तीप्रमाणे मोजणीच्या कामात हजारो रुपयांची रक्कम स्विकारुन पैसे देणार्याच्या बाजूने झुकते माप टाकून त्यांना हवी तशी मोजणी करुन
देणारा व पैसे न देणार्याचे नुकसान करुन वादविवाद आणि भांडणास कारणीभूत ठरणारा तसेच स्वत:ला अधिकार नसताना
नकाशात फेरबदल करुन बोगस नकाशे बनवून देणारा सांगोला भूमि अभिलेख (सिटी सर्व्हे) कार्यालयातील भ्रष्ट व उध्दट परिरक्षण भूमापक योगेश पाटील यास निलंबीत करुन त्याची
खातेनिहाय विभागीय चौकशी करणेबाबत पत्रकार हमीदभाई इनामदार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन मा.उपसंचालक,भूमि अभिलेख,पुणे यांनी भूमापक योगेश पाटील याची तात्काळ आजरा (जि.कोल्हापूर)
येथे प्रतिनियुक्तीवर बदली केली असून त्याचेविरुध्द विभागीय चौकशीचे आदेशही दिले असल्याने सांगोला शहरातील मिळकतधारकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
मिळकतपत्रिकेवर खरेदी दस्ताची नोंद,वारस नोंद व बँक बोजाची नोंद करण्यासाठी नागरिकांनी रितसर अर्ज दिल्यानंतरही सदर नोंदी मंजूर करण्यात जाणीवपूर्वक दिरंगाई करुन त्यांना हेलपाटे घालायला लावायचे
आणि शेवटी,या नोंदी धरण्यासाठी हजारो रुपयांची मागणी करायची."जो पैसे देईल त्याचेच काम,नाहीतर सहा महिने थांब"अशी प्रत्येकाला तंबी देवून व अरेरावीची भाषा वापरुन
सांगोला भूमि अभिलेख कार्यालयातील परिरक्षण भूमापक योगेश पाटील हा आर्थिक हव्यासापोटी मिळकतधारकांची अवहेलना करत त्यांचेशी नेहमीच उध्दट वर्तणूक करत होता.
तसेच मोजणीच्या कामात तर,या भूमापक पाटील याने इतका गोंधळ घातला होता की,मोजणीची मागणी करणार्या अर्जदाराकडून वारेमाप पैसे मिळाल्याने मॅनेज होवून
लगतच्या सर्व सहधारकांना नोटीसा न काढता व त्यांना हरकतीची संधी न देता,फक्त अर्जदाराला सामील असणार्यांनाच नोटीसा काढून मोजणी दिवशी कार्यालयात
बसूनच पैसे देणार्या अर्जदाराकडे झुकते माप टाकून,त्याला हवी तशी मोजणी करुन चुकीच्या मोजमापांसह बोगस नकाशे तयार करुन देणे व शेजारचे लगतधारक हजर नसताना
जागेवर गुपचुपपणे जावून हद्दीखूणा फिक्स करणे,असा प्रकार भूमापक योगेश पाटील याचेकडून सर्रास चालू होता. त्यामुळे,जागा मालकांमध्ये भांडण, वादविवाद व तक्रारी वाढू लागल्या होत्या.
त्याचबरोबर,भूमापक पाटील हा सांगोल्यात रुजू झाल्यापासून शहरातील एक खाजगी व्यक्ती आपल्या चुकीच्या व बेकायदेशीर कामांना कायदेशीर चाकोरीत बसवून घेण्यासाठी पाटीलला
पैशाचे आमिष दाखवत रोजच जेवणासाठी हाॅटेलला नेवू लागल्याने या खाजगी व्यक्तीशी त्याचे घनिष्ट संबंध निर्माण झाले होते. त्यामुळे या व्यक्तीचा भूमि अभिलेख कार्यालयातील थेट रेकार्ड
रुमपर्यंतचा वावर भलताच वाढला होता. याचाच फायदा घेत,या खाजगी व्यक्तीने रेकाॅर्ड रुममध्ये जावून आपल्यासह इतर मिळकत धारकांची महत्वाची गोपनीय कागदपत्रे,एस.आय.फाईल व नकाशाच्या मूळ
अभिलेखांची मुक्तपणे हाताळणी करत गुपचुपपणे अनेक कागदपत्रे गायब केली असल्याने संबंधित मिळकतधारकांना आपलीच कागदपत्रे मागणी करुनही मिळेनाशी झाली आहेत.
नागरिकांच्या मिळकतीसंदर्भात गोपनीय व महत्वाची कागदपत्रे जतन करुन एक शासकिय कर्मचारी म्हणून ती सांभाळण्याची जबाबदारी व कर्तव्य असताना पैशाच्या लोभापायी
एका खाजगी व्यक्तीच्या स्वार्थी वृत्तीला बळी पडून गोपनीय कागदपत्रांचा खजिनाच त्याच्या हाती सुपूर्द करणार्या भूमापक पाटील याने स्वत:सह
आपल्या शासकिय कार्यालयाचीही विश्वासार्हता संपुष्टात आणली होती.त्यामुळे,आपल्या शासकिय कर्तव्यात कसूर करुन आर्थिक हव्यासापोटी चुकीच्या मार्गाने कामे करणारा,
चुकीच्या मोजणी करुन आपापसात भांडणे लावणारा,सर्वसामान्य मिळकत धारकांशी अरेरावी करुन त्यांचेशी उध्दट वर्तणूक करणारा भ्रष्ट भूमापक योगेश पाटील अखेर विभागीय चौकशीच्या फेर्यात अडकला असून
त्याची कोल्हापूर जिल्ह्यात बदली करण्यात आल्याने त्याच्यामुळे त्रासून गेलेल्या सांगोला शहरातील मिळकत धारकांनी भूमि अभिलेख विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांचे मनापासून आभार मानले आहेत.
अधिकार नसताना नकाशामध्ये फेरबदल करुन बोगस नकाशे देण्याची गंभीर चूक :
भूमापक पाटील याने शहरातील एका खाजगी व्यक्तीला हाताशी धरुन त्याचेमार्फत हजारो रुपये मिळवून त्याच्या सांगण्यावरुन स्वत:ला अधिकार नसताना आणि कोणत्याही कोर्टाचा तसा आदेश नसताना,
सांगोला शहरातील अनेक वादग्रस्त व न्यायप्रविष्ठ असलेल्या जागांच्या क्षेत्रामध्ये व नकाशामध्ये फेरबदल करुन मूळ अभिलेखातही खाडाखोड करत बोगस नकाशे तयार करुन देण्याचे धाडस केले असून
ही बाब अत्यंत गंभीर व शिक्षेस पात्र असल्याचे वरिष्ठ अधिकार्यांना निदर्शनास आणून दिल्यानेच योगेश पाटील याचेविरुध्द खातेनिहाय विभागीय चौकशीचा ससेमिरा लागला व तात्काळ बदलीचा आदेशही पारित करण्यात आला.


0 Comments