google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक घटना...एक हजार वर्षांपूर्वीचे मानवी अवशेष सापडले ! चेहरा, डोके पोकळ !

Breaking News

खळबळजनक घटना...एक हजार वर्षांपूर्वीचे मानवी अवशेष सापडले ! चेहरा, डोके पोकळ !

 खळबळजनक घटना...एक हजार वर्षांपूर्वीचे मानवी अवशेष सापडले ! चेहरा, डोके पोकळ !


तब्बल एक हजार वर्षांपूर्वीचे मानवी अवशेष सापडले असून हे स्त्री आणि पुरुषाचे सांगाडे आहेत,  पुरातत्व खात्याच्या हाती हे अवशेष लागले असून, महिलेचा चेहरा आणि पोकळ डोके पाहून पुरातत्व विभागाला देखील आश्चर्य वाटू लागले आहे.

अनेक वर्षांपूर्वीचे मानवी शरीराचे सांगाडे यापूर्वीही आढळून आले आहेत परंतु त्यात फारसे वेगळेपण दिसून आलेले नव्हते. सजीवांचे सांगाडे काही काळ अस्तित्वात राहत असले तरी, हजार वर्षांपूर्वीच्या मानवी सांगाड्यामुळे अभ्यासक आश्चर्यचकित होणे स्वाभाविक आहे. 

जवळपास एक हजार वर्षांपूर्वी मृत्यू पावलेल्या एका स्त्री आणि पुरुषाचे हे सांगाडे पुरातत्व विभागालाच सापडले आहेत. हे दोन्ही अवशेष पती पत्नीचे असावेत असा अभ्यासकांचा अंदाज आहे.  कारण पुरुषाच्याच शेजारी महिलेला दफन करण्यात आलेले आहे. अशा शेकडो, हजारो वर्षापूर्वीच्या

 अवशेषातून त्याकाळची संस्कृती तसे अन्य काही माहितीवर प्रकाश पडत असतो, या दोन्ही अवशेषांबाबत मात्र पुरातत्व विभाग देखील आश्चर्यात पडला आहे, कारण पुरुषाचे अवशेष आणि स्त्री अवशेष यांच्यात मोठा फरक आढळून आला आहे, त्यामुळे एक कोडे देखील निर्माण झाले आहे.

पुरुषाच्या जवळच स्त्री चे दफन करण्यात आले असल्याचे दिसत आहे पण या महिलेचा चेहरा आणि डोके चक्क पोकळ असल्याचे दिसून येत आहे. पुरुषाचे अवशेष व्यवस्थित आहे पण महिलेचे मात्र तसे नाही, छायाचित्रात देखील ही बाब ठळकपणे दिसून येत आहे. महिलेचा चेहरा आणि डोके पोकळ का असावे ?

 हा अभ्यासकांनाही प्रश्न पडलेला आहे आणि त्यांना याचे उत्तर मिळाले नाही. जर्मनीतल्या सॅक्सोनी राज्यातल्या आयस्लेबेनमधल्या हेल्फ्टा इथल्या पूर्वीच्या शाही महालात हे अवशेष सापडले आहे. त्यांचा मृत्यू कधी आणि कसा झाला 

याबाबत नेमके स्पष्टीकरण मिळालेले नाही, पुरुषाचा सांगाडा उंच आहे तर तर महिलाच सांगाडा त्यापेक्षा काहीसा कमी उंचीचा आहे. दोन्ही सांगाडे जवळजवळ असून झोपलेल्या स्थितीत आहेत. महिलेचा सांगाडा मात्र मोठे कोडे निर्माण करून गेला आहे.

महिलेच्या या सांगाड्यात, चेहऱ्यावरील सर्व हाडे बेपत्ता आहेत आणि पुरुषाच्या अवशेषात त्याची सर्व हाडे व्यवस्थित आहेत त्यामुळे हा गुंता निर्माण झाला आहे. असे घडण्याचे कारण काय असावे 

हा प्रश्न पडलेला असून शास्त्रज्ञ याचा अभ्यास करू लागले आहेत. सदर अवशेषांची तपासणी प्रयोग शाळेतच करण्यात येत असून त्यांच्या मृत्यूंचे कारण देखील शोधले जात आहे,

 परंतु या मृत पती पत्नीच्या बाबतीत शास्त्रज्ञांनी काही निष्कर्ष काढले आहेत. हे पत्नी पत्नी शाही परिवारातील असावेत असा अंदाज करण्यात आला आहे, त्यांच्यावर करण्यात आलेल्या अंत्यसंस्कारावरून काही उकल होताना दिसत आहे. चाकू, बेल्ट सेट,

 फिटिंग असे साहित्य या अवशेषांसोबत मिळून आले आहे. त्यावरून हे पती पत्नी मोठ्या श्रीमंत घरातील होते असा अंदाज लावण्यात येत असून पुरुषाच्या मृतदेहावर अधिक सजावट करण्यात आली होती, 

याचे कारण मात्र समजून येत नसल्याचे शास्त्रज्ञ सांगू लागले आहेत.  एक हजार वर्षांपूर्वी मृत्यू झालेले हे अवशेष अभ्यासकांना बुचकळ्यात टाकत असून, त्याच्यावर अभ्यास सुरु करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments