google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 चिकमहुद ग्रामपंचायतिच्या निवडणुकीमध्ये भारत राष्ट्र समिती (BRS) रिंगणात उतरणार . भारत राष्ट्र समितीचे नेते मा.रणसिंह विठ्ठल देशमुख यांचे स्पष्टीकरण.

Breaking News

चिकमहुद ग्रामपंचायतिच्या निवडणुकीमध्ये भारत राष्ट्र समिती (BRS) रिंगणात उतरणार . भारत राष्ट्र समितीचे नेते मा.रणसिंह विठ्ठल देशमुख यांचे स्पष्टीकरण.

 सांगोला तालुक्यातील चिकमहुद ग्रामपंचायतिच्या निवडणुकीमध्ये भारत राष्ट्र समिती (BRS) रिंगणात उतरणार .


भारत राष्ट्र समितीचे नेते मा.रणसिंह विठ्ठल देशमुख यांचे स्पष्टीकरण.

सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या असून सांगोला तालुक्यातील चर्चेत असणारी चिकमहुद ग्रामपंचायत ही भारत राष्ट्र समिती ही निवडणूक स्वबळावर लढवणार आहे. 

लढवण्याचे कारण असे की ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शेतकरी उमेदवार नसल्यामुळे ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या विकासासाठी शेतकरी विकास आघाडी असा पॅनल उभा करून

 भारत राष्ट्र समिती निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहे. तसेच लवकरच उमेदवार यादी जाहीर करू.भारत राष्ट्र समितीच्या हातात सत्ता दिल्यास सर्व गोरगरीब जनतेला व शेतकऱ्यांना घेऊन 

चिकमहुद गावाचा सर्वांगीण विकास करू असे आश्वासन भारत राष्ट्र समितीचे मा. रणसिंह देशमुख, आप्पासाहेब वाघमारे, प्रकाश कदम, सोमनाथ नाईकनवरे, संतोष साठे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments