सांगोला तालुक्यात तापाची साथ : काही खासगी रुग्णालयांत नागरिकांची पिळवणूक...
सांगोल्यात भीमशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य आक्रमक..
सांगोला /( शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे)
तालुक्यात सर्वत्र तापाच्या साथीने चांगलाच कहर केला आहे. याच संधीचे सोने करीत खासगी डॉक्टर तापामुळे व कमजोरी आलेल्या रुग्णांना कुठलेही बिल न देता पाचशेहून अधिक रुपये उकळत आहे. याकडे आरोग्य विभागाच्या अधिकान्यांचे दुर्लक्ष होत आहे.
मागील दीड महिन्यापासून तालुक्यात ढगाळ वातावरण कायम असून थांबून थांबून पाऊसही पडत आहे. याच बदलत्या वातावरणासह ठिकठिकाणी साचणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे डेंग्यू व मलेरिया या कीटकजन्य आजारांसह व्हायरल फ्लूने जिल्ह्यात चांगलेच डोके वर काढले आहे.
परिणामी, खासगी आणि शासकीय रुग्णालयांत तापाच्या रुग्णांची संख्या बऱ्यापैकी वाढली आहे. शासकीय रुग्णालयात आरोग्य सेवा निःशुल्क झाल्याने तेथे रुग्णांची तोबा गर्दी होत आहे. याच पार्श्वभूमीवर काही नागरिकांकडून रुग्णाला वेळीच उपचार मिळावेत, या
हेतूने खासगी रुग्णालयांकडे धाव घेतली जात आहे पणयाच संधीचे सोने करीत काही खासगी रुग्णालयांत रुग्णांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.मात्र याकडे आरोग्य यत्रणेतील अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानत आहे.
काहीं डॉक्टर कडून जोपासले जातेय समाजभावना शहर व तालुक्यातील काही डॉक्टर सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक रुग्णांना जीवनदान देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. गोरगरीब गरजू रुग्णांना रुग्णसेवा अगदी अल्प दरात पुरवत असल्याचे वास्तव आहे. यामुळे
सांगोल्यात वैद्यकीय सेवेकडे समाजसेवेच्या भावनेतून पाहिले जाते. त्यामुळे रुग्ण डॉक्टरला देवरूप मानतात.काहींकडून जोपासले जातेय समाजभान सांगोला तालुक्यातील गावांमध्ये असणारे व शहरातील बहुतांश खासगी डॉक्टर हॉस्पिटल सप्लायच्या
•नावाखाली अल्पदरात खरेदी केलेल्या सलाईन रुग्णांना चढवून कुठलेही बिल न देता
पाचशे रुपयाहून अधिकचे शुल्क आकारत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.असे असले तरी सांगोला तालुक्यातील असणान्या गावामध्ये व शहरातील काही खासगी डॉक्टर सामाजिक बांधिलकी जोपासत नाममात्र शुल्क रुग्ण किंवा
रुग्णांच्या नातेवाइकांकडून घेत असल्याचेही वास्तव आहे. खासगी रुग्णालयांना हॉस्पिटल सप्लायच्या नावावर पुरवता झालेल्या औषधांची खासगी रुग्णालयांतून
विक्री करणे नियमबाह्य आहे; परंतु या औषध व सलाईनचा वापर खासगी डॉक्टर रुग्णांसाठी करू शकतात. शिवाय संबंधित औषधांचे शुल्क रुग्णांकडून आकारू
शकतात; पण हे शुल्क औषधांच्या एमआरपी पेक्षा जास्त नसावे. आयएमए'च्या नियमावलीनुसार प्रत्येक खासगी डॉक्टरांनी रुग्णाकडून पैसे स्वीकरतेवेळी रुग्णालय किंवा रुग्णाच्या नातेवाइकाला बिल देणे क्रमप्राप्त आहे.
मा. विजयबापू बनसोडे भीमशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष
0 Comments