धक्कादायक ..पाचेगाव बु. ता. सांगोला येथे टेंभू उपसा सिंचन योजनेचा कॅनल
फुटल्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान...पहा विडीओ...
कोळे प्रतिनिधी:- (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
टेंभू प्रकल्पाच्या माध्यमातून कृष्णा नदी डोंगर माथा चढून माण खोऱ्यातील कडेगाव, खानापूर, आटपाडी, कवठेमंहाकाळ,सांगोला या दुष्काळी पट्ट्याला वरदान ठरलेली ही योजना आहे.हे फक्त शक्य झालेले आहे.कारण आशिया खंडातील सर्वात मोठा असलेला प्रकल्प म्हणजे टेंभू योजना आहे.
यामधे प्रामुख्याने सांगली, सातारा,कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांना वरदान ठरलेली ही योजना आहे.यामुळे पिण्याच्या व शेतीचा पाण्याचा प्रश्न यामुळे मार्गी लागला आहे.
या मध्ये पाचेगाव बुद्रुक या ठिकाणी पाण्याचे आवर्तन सुरू होते. हा कॅनॉल हा कवठेमंकाळ सब डीविजन मध्ये येतो कॅनॉल चे पाणी पाचेगाव बुद्रुक मार्गे किडेबिसरी,नागज व आसपासच्या परिसरात मध्ये पाण्याचे आवर्तन सुरू होते.
टेंभू उपसा सिंचन योजनेचा तीन नंबरचा पंप सुरू झाल्यामुळे पाण्याचा उच्च दाबामुळे रात्री 12.30 ते 1 च्या सुमारास या ठिकाणी असलेल्या सदरचा कॅनल फुटून लाखो लिटर वाया
जाऊन तेथील शेतकऱ्याचे अडीशे ते तीनशे एकर शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.ज्वारी,बाजरी,मका,भुईमुगाच्या शेंगा,डाळिंब, बोर या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सदर घडलेल्या घटनेबाबत टेंभू उपसा सिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांना रात्री फोन करून सांगितले असता अद्याप पर्यंत कोणताही शाशनाचा अधिकारी या ठिकाणी आलेला नाही. सदर झालेले शेतकऱ्यांची नुकसान शासनाने स्तरावर पंचनामे करून शासनाने शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी.
0 Comments