google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 होऊ द्या चर्चा या कार्यक्रमात जनतेनी सहभागी व्हावे : राहुल चव्हाण

Breaking News

होऊ द्या चर्चा या कार्यक्रमात जनतेनी सहभागी व्हावे : राहुल चव्हाण

 होऊ द्या चर्चा या कार्यक्रमात जनतेनी सहभागी व्हावे : राहुल चव्हाण


सांगोला/ (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

   शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने राज्यभर होऊ द्या चर्चा हा कार्यक्रम आयोजीत केलेला आहे..या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेच्या भावनेला मोकळी वाट करुन देण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

सदर कार्यक्रमाचे आयोजन रविवारी व सोमवार या दोन दिवशी सांगोला तालुक्यात होणार असुन रवीवारी दिनांक 8/10/2023 रोजी सायंकाळी 6-00 वाजता महिम सायंकाळी 7-00 वाजता महुद तसेच

 सोमवार दिनांक 9/10/2023 रोजी सकाळी 9-00 वाजता वाकी सकाळी 10-30 वाजता शिवणे व दुपारी 12-00वाजता सांगोला येथे आयोजित केला  असल्याची माहीती माढा लोकसभा मतदार संघाचे संपर्क प्रमुख मा.राहुल चव्हाण यांनी दिली.

  सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून सध्या देशभर व राज्यभर जो  महागाईचा आगडोंब उसळला आहे त्यावर आपली भुमिका विषद करता येईल..विशेषता गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या किमती यामुळे सामान्यांची अर्थव्यवस्था कोलमडुन गेली आहे

 तसेच डिझेल, पेट्रोल चे गगनाला भिडलेले भाव यामुळे सर्व वस्तूंचे दर वाढले आहेत.त्याचा बोजा सामान्य नागरीकांना महागाईच्या माध्यमातून सोसावा लागत आहे.आशा महागाईच्या आगडोंबावरती जनतेला खुल्या मनाने आपले मत मांडता येणार आहे.

  तसेच सध्या प्रत्येक क्षेत्रात जे खाजगीकरण करण्याचा घाट घातला आहे ना..त्याचा परिणाम काही दिवसांत घराघरात बसणार‌ आहे..यावरती सुध्दा आपणास सडेतोड मत मा़डता येणार आहे..तसेच केंद्रसरकारचा व राज्य सरकारचा जो मनमानी करभार चालला आहे त्यावरती आपणास आपले मत निर्भीडपणे मांडता येणार आहे..

  विशेषता आपण एखाद्या लोकप्रतिनिधींना निवडुन‌ देत असताना त्याचा पक्ष..विचार धारा,जनतेशी असलेली विश्वासाहर्ता याचा विचार करुन आपण तो लोकप्रतिनिधी निवडत असतो.समजा तो लोकप्रतिनिधी आपल्या पक्षाशी..संघटनेशी..

जनतेशी फारकत घेऊन जर वेगळी चुल‌मा़डत असेल व जनतेच्या विश्वासाला तडा देत असेल तर आपले मत सक्षमपणे मांडण्याचा आपल्याला‌ संविधानने अधिकार दिलेला आहे..

आपण याबाबतचे आपले मत होऊ द्या चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून मांडण्यासाठी हे एक व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे त्याचा सर्वांनी उपयोग करून आपली मते मांडण्यासाठी सांगोला विधानसभा मतदार संघातील जनतेनी उपस्थित राहावे 

सदर कार्यक्रमास प्रा.लक्ष्मण हाके सर, संभाजीराजे शिंदे , सुर्यकांत घाडगे, कमरुद्दीन खतीब, संतोष राऊत, अरविंद पाटील,भारत गवळी गणेश कांबळे,हरीभाऊ पाटील,गोरख येजगर, संतोष खडतरे,असलम मुलाणी,तुषार इंगळे,प्रकाश‌

 जाधव,नवल गाडे,अंकुश पवार ,विकास चव्हाण, अमर कोळी, सलीम पठाण,फिरोज मुलांची इत्यादी नेते उपस्थित राहणार असल्याची माहीती  माढा लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख मा‌ राहुल चव्हाण यांनी सांगितले

Post a Comment

0 Comments