google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 इस्रोतील सूनबाईंचा सांगोलेकरांना अभिमान सांगोल्यासारख्या भागातील एक महिला चांद्रयान मोहिमेत सहभागी असल्याने ही बाब या भागातील सर्वांना अभिमानाची

Breaking News

इस्रोतील सूनबाईंचा सांगोलेकरांना अभिमान सांगोल्यासारख्या भागातील एक महिला चांद्रयान मोहिमेत सहभागी असल्याने ही बाब या भागातील सर्वांना अभिमानाची

 इस्रोतील सूनबाईंचा सांगोलेकरांना अभिमान सांगोल्यासारख्या भागातील


एक महिला चांद्रयान मोहिमेत सहभागी असल्याने ही बाब या भागातील सर्वांना अभिमानाची

 सांगोला - 'चांद्रयान - ३' ही महत्त्वाकांक्षी मोहीम यशस्वी झाल्याने जगभरातून भारताचे कौतुक होत आहे. या मोहिमेमध्ये सांगोल्यातील तनुजा पतकी यांचा सहभाग होता. तनुजा या बंगलोरच्या उपग्रह केंद्रात वरिष्ठ अभियंता व या मोहिमेतील मिशनच्या सदस्य आहेत.

सांगोल्यासारख्या भागातील एक महिला चांद्रयान मोहिमेत सहभागी असल्याने ही बाब या भागातील सर्वांना अभिमानाची आहे.

चांद्रयान - ३' मोहीम यशस्वी करीत इस्रोच्या शास्त्रज्ञांनी अतुलनीय कामगिरी केली. संपूर्ण जगाने भारताचे या कामगिरीचे कौतुक केले आहे. या मोहिमेमध्ये सांगोला तालुक्यातील दोघा जणांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग होता. 

या दोघा जणांमध्ये एक महिला असल्याने ही संबंध महिला वर्गासाठी अभिमानाची गोष्ट आहे. महिला असूनही आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आपल्या कर्तृत्वावर संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या इस्रो सारख्या संस्थेमध्ये त्या काम करीत आहेत.

अनुजा पतकी यांनी सबंध महिला वर्गाबरोबरच सांगोल्याची मान देशभरात उंचावली आहे. सांगोल्यातील असणारे अनंत पतकी हे ''इस्रो''मधून वरिष्ठ सायंटिस्ट म्हणून निवृत्त झाले आहेत. 

अनंत पतकी यांच्या सूनबाई तनुजा पतकी या सध्या बंगलोरच्या उपग्रह केंद्रात वरिष्ठ अभियंता आहेत व त्या मोहिमेतील मिशन टीमच्या सदस्य आहेत. त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले असून गेली १८ वर्षे इस्रोत कार्यरत आहेत.

उपग्रह अवकाशात सोडल्यानंतर त्याचा मार्ग, स्थिती व दिशा नियंत्रित ठेवावी लागते. त्यासाठी विविध सेन्सर्स कडून डेटा गोळा करत उपग्रहाला पूर्व नियोजित स्थितीत आणण्याचे काम तनुजा यांच्या टीमकडे आहे. तनुजा यांचे पती अभिजित पतकी हे आयआयटी मुंबईत शिकले असून इलेक्ट्रॉनिक्स चिप डिझाईनमध्ये काम करतात. अनंत पतकी यांचे शिक्षण सांगोला, सोलापूर, सांगली व बंगलोर येथे झाले.

त्यांनी स्वतः डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या बरोबर काम केले होते. त्यांचा भारताचा प्रथम उपग्रह ''आर्यभट्ट''मध्ये महत्त्वाचा सहभाग होता. ते सध्या पुणे येथे स्थायिक आहेत. त्यांच्याबरोबरच त्यांच्या सूनबाईनेही 'इस्रो'मध्ये आपले नाव कमावले आहे.

सांगोल्यातील असणारे हे कुटुंब सध्या नोकरीसाठी सर्वजण विविध शहरात स्थायिक झाले आहेत. 'चांद्रयान - ३' ही महत्त्वाकांक्षी मोहीम तनुजा पतकी यांचा सहभाग असूनही हे कुटुंब प्रसिद्धीपासून नेहमी दूरच राहिले आहे. परंतु दुष्काळी असणाऱ्या सांगोला तालुक्यातील एक महिला आपल्या कर्तृत्वाने, कष्टाने, जिद्द, चिकाटीच्या जोरावर यशस्वी होते हे शिक्षण घेणाऱ्या मुलींपुढे महिलांपुढे त्या आदर्शवतच आहेत.

Post a Comment

0 Comments