google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोळ्यात आज मंगळवारी बैलगाडी शर्यतीचा थरार रंगणार ,मान्यवरांची उपस्थिती

Breaking News

सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोळ्यात आज मंगळवारी बैलगाडी शर्यतीचा थरार रंगणार ,मान्यवरांची उपस्थिती

 सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोळ्यात


मंगळवारी बैलगाडी शर्यतीचा थरार रंगणार ,मान्यवरांची उपस्थिती

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला ( प्रतिनिधी) सांगोला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय पाणीदार आमदार शहाजी बापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समस्त कोळे ग्रामस्थांच्या वतीने आज मंगळवार १७ रोजी सकाळी १० वाजता कोळे ता.

 सांगोला येथील रेडामाई मंदिर, शेटफळे रोड कोळे येथे जनरल अ व ब गट तसेच आदत अशा तीन गटात भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले आहे. 

या बैलगाडी शर्यतीसाठी माढ्याचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, सत्कारमूर्ती आमदार शहाजी बापू पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे पाटील, शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर, 

भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार सावंत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर बैलगाडी शर्यतीचा थरार रंगणार आहे. बैलगाडी जनरल अ गट प्रथम १ लाख ११ हजार रुपये, द्वितीय ७५ हजार रुपये, तृतीय ५१ हजार रुपये जनरल 

ब गट प्रथम ५१ हजार  रुपये,द्वितीय ३१ हजार रुपये तृतीय २१ हजार रुपये आदत गट प्रथम ११ हजार रुपये द्वितीय ७ हजार रुपये तृतीय ५ हजार असे विजेत्या बैलगाडी स्पर्धकांना रोख स्वरूपात बक्षीस देऊन सन्मान करण्यात येणार आहे  

बैलगाडी शर्यतीसाठी बैलगाडी मालकाचे फोटो, आधार कार्ड झेरॉक्स व दोन बैलाचे फोटो संयोजकांकडे जमा करावेत असे आवाहन पंढरी आलदर, सयाप्पा सरगर ,गंगाराम पुजारी, दत्ता सरगर, सचिन चोरमुले, दत्ता आलदर आदींनी केले आहे.

Post a Comment

0 Comments