ब्रेकिंग न्यूज..खा.रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना साडेचार वर्षात दिसला नाही
जनता दरबार निवडणुकीच्या तोंडावरच कसला जनता दरबार?जनतेतून तीव्र नाराजीचा सूर
सांगोला/प्रतिनिधी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी गेली साडेचार वर्षे सांगोला तालुक्यातील जनतेचे प्रश्न कधीच ऐकून घेतले नाहीत.
साडेचार वर्षे या खासदारांना जनता दरबार घेता आला नाही का? निवडणुकीच्या तोंडावर या खासदारांनी जनता दरबार आयोजित केला आहे.
या खासदारांनी ज्या मतदारांच्या जीवावर निवडून आले त्यांना साधे विचारलेही नाही व त्यांचे प्रश्नही सोडवलेले नाहीत. त्यामुळे या खासदाराबाबत सांगोला तालुक्यातील जनतेतून तीव्र नाराजी पसरली आहे.
कोरोनाच्या काळात तालुक्याची परिस्थिती अतिशय वाईट असताना खासदारांनी साधी विचारपूस केली नाही.
तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक व गावोगावच्या सरपंचांची ओळख तरी त्यांना आहे का? हे खासदार गेली सहा महिन्यातून कधीतरी कुठेतरी तोंड दाखवीत आहेत.
जनतेचे प्रश्न काय आहेत? त्यांना काय अडचणी आहेत? शेतकर्यांचे काय प्रश्न आहेत? व्यापार्यांचे काय अडचणी आहेत? शहरी व ग्रामीण भागात प्रचंड प्रमाणात वेगवेगळ्या घटना घडल्या.
अनेकजण दु:खी असताना या खासदारांनी कधी त्यांची साधी चौकशी तरी केली का? हे सांगोला तालुक्यातील जनता कधीही विसरणार नाही. जनतेच्या सुख-दुःखात कधीही न येणार्या खासदारांना निवडणुकीच्या तोंडावरच जनता व जनता दरबार दिसतो का?
काही दिवसांपूर्वी ‘खासदार दाखवा व बक्षीस मिळवा’ अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. यापूर्वीचे सर्व खासदार वैयक्तिक मतदार व जनतेच्या संपर्कात राहत होते.
परंतु हे खासदार काही बोटावर मोजण्या इतक्याच लोकांना ओळखतात. तालुक्यात एक हजार मताचा गठ्ठा असणार्या प्रमुख कार्यकर्त्याला हे खासदार ओळखतात का? हा मोठा प्रश्न आहे. तालुक्यात विकासाच्या योजना फक्त कागदावरच आहेत.
औद्योगिक वसाहतीचा प्रश्न मोठा आहे. त्याची साधी चौकशीही त्या खासदारांनी केली नाही. ‘खासदार दाखवा व बक्षीस मिळवा’ अशी पोस्ट जर सोशल मीडियावर फिरत असेल तर खासदारांच्या कामाबाबत किती नाराजी जनतेत आहे
हे त्यांना येणार्या निवडणुकीत लोकांच्या दारात गेल्यावरच कळणार आहे. ज्या मतदारांनी मतदान केले व त्यांना मदत केली त्यांची साधी साडेचार वर्षे विचारपूसही न करणारा एकमेव खासदार असेल अशी चर्चा शहरी व ग्रामीण भागात सध्या दिसत आहे.
साडेचार वर्षे झोपी गेलेल्या खासदारांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच कसा जनता दरबार घ्यायचं सुचलं व जनता दरबारात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होणार का? हा मोठा प्रश्न आहे हे न उलगडणारे कोडे आहे.
‘आगीतून उठून फुफाट्यात पडणे’ या म्हणीप्रमाणे या खासदारांचे काम आहे. साडेचार वर्षात त्यांना ज्या मतदारांनी आपल्याला मतदान केले आपण त्यांना निवडणुकीत काय आश्वासने दिली ती कधी पूर्ण करणार असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून विचारला जात आहे.


0 Comments