google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर बंद कारखान्यातून १६ कोटींचा अंमली पदार्थांचा साठा जप्त

Breaking News

सोलापूर बंद कारखान्यातून १६ कोटींचा अंमली पदार्थांचा साठा जप्त

 मोठी बातमी.... सोलापूर बंद कारखान्यातून १६ कोटींचा अंमली पदार्थांचा साठा जप्त


सोलापूर : पुणे रस्त्यावरील चिंचोळी एमआयडीसीमध्ये एका बंद कारखान्यावर मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापेमारी करून सुमारे १६ कोटी रूपये किंमतीचा ८ किलो उत्तेजक एमडी औषधांचा साठा जप्त केला.

 तसेच मोठ्या प्रमाणावर कच्चा मालही हस्तगत केला. या कारवाईने अंमलीपदार्थ उत्पादन क्षेत्रात सोलापूरचे नाव मुंबईसह परदेशाला जोडले गेल्याचे पुन्हा एकदा उजेडात आले आहे.

मुंबई पोलीस गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष क्र. ९ च्या पथकाने चिंचोळी एमआयडीसीतील एका बंद कारखान्याचा पर्दाफाश करून मोठी कारवाई केली. 

१६ कोटी रूपये किंमतीच्या ८ किलो एमडी ड्रग्जबरोबर त्यासाठी लागणारा कच्चा मालही या कारवाईत सापडला. या कारवाईमुळे स्थानिक पोलीस आणि अन्न औषध प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Post a Comment

0 Comments