ब्रेकिंग न्यूज...सांगोला नाका परिसर सुधारणा कामास प्रारंभ;
मंगळवेढा शहरालगतच्या कान्होपात्रानगर ग्रामपंचायतीची अधिसूचना जनावरांसाठी मुरघास निर्मितीकडे शेतकऱ्यांचा ओढा...
सांगोला : विविध रोगामुळे डाळिंब पीक नष्ट झाल्यानंतर सांगोला तालुक्यातील शेतकरीवर्ग दुग्ध व्यवसायाकडे वळला आहे. दूध व्यवसायासाठी जर्सी गायींचे संगोपन मोठ्या प्रमाणात शेतकरी करत आहेत.
सध्या जनावरांना चाऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात मुरघास तयार करीत असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. तालुक्यात तीन लाख 90 हजार 589 एवढे पशुधन आहे.
सांगोला म्हटलं की 'डाळिंब' हे समीकरण दृढ झाले आहे. देश, जगभर तालुक्याला डाळिंबातून वेगळे ओळख निर्माण झाली होती. परंतु याच डाळिंबांना विविध रोगामुळे मोठ्या प्रमाणात
डाळिंब बागा नष्ट झाल्या आहेत. नवीन रोपे लावले तरी झाडे येत नसल्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी सध्या दुग्ध व्यवसायाकडे वळला आहे.
या दूध व्यवसायातून प्रत्येक दहा दिवस किंवा महिन्याच्या आत दुधाचे पैसे मिळत असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार सर्वस्वी या व्यवसायावरच अवलंबून असल्याचे चित्र दिसत आहे.
तालुक्यात 81 हजारांपेक्षा पेक्षा जास्त गायवर्ग पशुधन आहे. विशेषतः जर्सी गाईंची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सध्या पशुपालक या जनावरांच्या चाऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात
मकेचा मुरघास तयार करून तो साठवणूक करताना दिसून येत आहे. या मक्याच्या मुरघासमुळे वर्षभर जनावरांना चांगल्या प्रतीचा चारा मिळू लागला आहे.
त्याचबरोबर या मुरघास वापरल्यामुळे जनावरांचे दूधही वाढण्याची शेतकरी वर्गातून सांगण्यात येत आहे. डाळिंब बागा काढलेल्या क्षेत्रात शेतकरी मक्याचे उत्पन्न घेताना दिसत आहे.
मुरघास चाऱ्यासाठी शेतकरी आपले मक्याचे उभे पिकच विक्री करीत आहे. ग्रामीण भागामध्ये मुरघास तयार करण्यासाठीचे मशीन, ट्रॅक्टरचा संपूर्ण सेटच अनेक जणांनी विकत घेतला आहे. मुरघास तयार करण्याचा व्यवसायही सध्या तेजीत आहे.
मुरघास करताना घ्यावयाची काळजी -
- 75 ते 80 दिवसाच्या मकेच्या पिकाचा मुरघास करावा
- मक्याच्या तोडणीनंतर दुसऱ्या दिवशी मुरघास (कट्टर) तयार करावा
- कट्टर केलेला चारा चांगल्या प्रकारे हवाबंद केला पाहिजे
- बॅगमध्ये व्यवस्थित साठवणूक न केल्यास बुरशी लागण्याचा संभव असतो
- साठवणूक व्यवस्थित न केल्यास बुरशीमुळे जनावरांना विषबाधेची शक्यता असते
- साठवणूक केल्यानंतर 40 ते 45 दिवसानंतर त्याचा चाऱ्यासाठी वापर करण्यात यावा
- साठवणुकीसाठी वरील बॅग प्रत्येक वेळी बदलली नाही तरी आतील प्लॅस्टिकचा बॅग प्रत्येक वेळी बदलावी
तालुक्यातील पशुधन -
- गाय वर्ग - 81 हजार 98,
- म्हैस वर्ग - 66 हजार 704,
- शेळी - एक लाख 79 हजार 58,
- मेंढी - 50 हजार 930,
- पिग - 70,
- एकूण - 3 लाख 90 हजार 589.
सांगोला नाका परिसर सुधारणा कामास प्रारंभ; मंगळवेढा शहरालगतच्या कान्होपात्रानगर ग्रामपंचायतीची अधिसूचना
पशुपालकांनी आपल्या जनावरांसाठी ओल्या व सुक्या चाऱ्याचे व्यवस्थित नियोजन केले पाहिजे. मुरघास हा चारा अत्यंत चांगला असून तो तयार व साठवणूक करताना विशेष काळजी घेतली पाहिजे.
सतत एकच चारा जनावरांना देण्यात येऊ नये. जनावरांसाठी शेतकऱ्यांनी वर्षभराचे तरी चाऱ्याचे नियोजन अगोदरच केले पाहिजे - असलम सय्यद, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी, सांगोला.
माझ्याकडे 70 विविध जनावरे आहेत. मी बॅग ऐवजी जमिनीतच खड्डा काढून शेततळ्याचा (500 मायक्रोन) कागद वापरून मुरघास तयार करत असतो.
मुरघाशीच्या वापरामुळे जनावरांना वर्षभर चांगल्या प्रतीचा चारा मिळतो - राजू खंडागळे, पशु पालक, संगेवाडी, ता. सांगोला.


0 Comments