google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी... वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ होणे गरजेचे वृत्तपत्र विक्रेता हा वृत्तपत्राचे काळीज- आमदार शहाजी बापू पाटील

Breaking News

मोठी बातमी... वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ होणे गरजेचे वृत्तपत्र विक्रेता हा वृत्तपत्राचे काळीज- आमदार शहाजी बापू पाटील

 मोठी बातमी... वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ होणे गरजेचे वृत्तपत्र  


हा वृत्तपत्राचे काळीज- आमदार शहाजी बापू पाटील

संघटनेच्या वतीने आमदार शहाजीबापू पाटील यांना निवेदन देताना पदाधिकारी अध्यक्ष शिवलिंग मेढेकर संघटक श्याम थोरात श्याम थोरात पंढरपूर अध्यक्ष महेश पटवर्धन सांगोला अध्यक्ष रविराज शेटे मंगळवेढा अध्यक्ष विजय भगरे


सांगोला प्रतिनिधी  (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

          वृत्तपत्रासाठी बातम्या तयार करून त्या पेपरमध्ये छापणे व त्यानंतर मोठे मोठे गठ्ठे वित्रकांपर्यंत पाठविणे व वितरक खऱ्या बातम्या आपल्यापर्यंत येऊन पोहोचवतात व त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही 

व वृत्तपत्र विक्रेता हाच खऱ्या अर्थाने वर्तमानपत्राची काळीज आहे व एकदा काळीज बंद पडले स्विच ऑफ झाले तर काहीही उपयोग नाही व ब्रिटिशांच्या काळात वृत्तपत्राने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले व यात विक्रेत्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यामुळे

 मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित दादा पवार यांच्याशी बोलून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी  व कल्याणकारी मंडळ गरजेचे आहे असे सांगेन याची आज ग्वाही देतो असे मत आमदार शहाजी बापू पाटील यांनी भारतीय वृत्तपत्र विक्रेता

 दिवस व वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून तरुण भारत संवाद सोलापूर व सोलापूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने योग भवन पंढरपूर येथे आयोजित वृत्तपत्र विक्रेत्यांच्या सन्मान प्रसंगी आमदार शहाजी बापू पाटील बोलत होते

         सुरुवातीस आमदार शहाजी बापू पाटील युरोपियन शुगरचे अध्यक्ष उमेश परिचारक तरुण भारत संवाद सोलापूर आवृत्तीप्रमुख विजयकुमार देशपांडे पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुनील वाळुंजकर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवलिंग मेढेकर वितरण विभाग प्रमुख अनुप पुरोहित संघटक श्याम थोरात सचिव बंटी बाबर 

सांगोला तालुका वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष रविराज शेटे पंढरपूर अध्यक्ष महेश पटवर्धन उपसंपादक श्रीशैल्य भद्र शेट्टी महेश कुलकर्णी शरद मच्चे मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले

 वृत्तपत्र विक्रेता वृत्तपत्राचा कणा आहे व नियमितपणे वृत्तपत्र पोचवण्याचे काम विक्रेत्याशिवाय होऊ शकत नाही त्यामुळे विक्रेता दिनाचे औचित्य साधून त्यांचा सन्मान करण्याचे ठरले असे संपादक विजयकुमार देशपांडे यांनी सांगितले 

तसेच यावेळी संघटनेचे माजी कोषाध्यक्ष गोरख भिलारे व संघटनेचे सांगोला तालुका अध्यक्ष रविराज शेटे यांनी कल्याणकारी मंडळासाठी आमदार शहाजी बापू व आमदार प्रशांत परिचारक यांनी प्रयत्न करून प्रश्न सोडवावा असे सांगितले तसेच संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले

आज स्पर्धेचे युगातही वृत्तपत्राचे काम कौतुकास्पद आहे व त्यांच्या समस्या मी जवळून पाहिले आहेत तर मुख्यमंत्री हे सर्वसामान्य माणसांच्या व्यथा जाणतात त्यामुळे विधानसभेत आमदार शहाजी बापू यांनी प्रश्न मांडून सोडवावा

                उमेश परिचारक

              (अध्यक्ष युटोपियन शुगर)

          सदर कार्यक्रमास संघटनेचे उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे कोषाध्यक्ष उत्तम चौगुले कार्याध्यक्ष अरुण कोरे मुकुंद हरिदास अमोल बोत्रे शेखर तेंडलुकर संजय रणदिवे विकास जावीर सीबीएस न्यूज संपादक चांद भाई शेख अर्जुन पोतदार संतोष कुलकर्णी सचिन शेटे गजानन बागल बाळासो जाधव 

बाबुराव पवार बाळासो जोशी हेरंब देशमुख सुरेश डोंगरे सोलापूर जिल्ह्यातील सर्व विक्रेते उपस्थित होते यावेळी आमदार शहाजी बापू पाटील यांचा पंढरपूर विक्रेत्यांतर्फे सत्कार ही करण्यात आला

 व सर्व विक्रेत्यांची बापूंबरोबर सेल्फी काढण्यासाठी झुंबड उडाली कार्यक्रमासाठी संवाद चे अतुल फराटे  संतोष रणदिवे चैतन्य उत्पाद दादासो कदम वृत्तपत्र संघटनेचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन अमोल रणदिवे तर आभार गोरख भिलारे यांनी मानले

Post a Comment

0 Comments