सांगोला तालुक्यात पाचेगावच्या कालवा फुटीप्रकरणी शेतकरी आक्रमक मोबदल्याविना दुरुस्तीला विरोध
सांगोला : सांगोला तालुक्यातील पाचेगाव बु. येथे टेंभू योजनेचा कवठेमहांकाळचे तालुक्यात जाणारा कालवा फुटून शेतकऱ्यांची मोठे नुकसान झाले होते. या कालव्याच्या निर्मितीपासून येथील शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला मिळाला नाही.
सध्या नुकसान झालेल्या पिकाचे व भूसंपादनाचा मोबदला मिळाल्याशिवाय आम्ही कालवा दुरुस्त करू देणार
नसल्याची भूमिका येथील शेतकऱ्यांनी घेतली आहे.टेंभू उपसा सिंचन योजनेचा पाचेगाव येथे कालवा फुटून लाखो लिटर पाणी शेतात घुसून मोठया प्रमाणात नुकसान झाले.
या प्रकल्पाच्या गेलेल्या कालव्याच्या भूसंपादनाचा मोबदला अद्याप येथील मिळाला नाही. तसेच सध्या कॅनॉल फुटून तालुक्यातील पाचेगाव बु. येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
टेंभूचे अधिकारी भूसंपादनाचा पाण्यासाठी केलेल्या कामाची व इतर सर्व ग्रामविकासाच्या कामाला चालना देण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक जिंकण्याचा निर्धार सर्व नवीन जुन्या कार्यकर्त्यांनी केला.
व भूसंपादनाचा मोबदला दिल्याशिवाय आम्ही कालवा दुरुस्तच करू देणार नसल्याची भूमिका या परिसरातील शेतकऱ्यांनी घेतली आहे.
टेंभूच्या कालवा भूसंपादनाचा मोबदला अद्याप मिळाला नाही. सध्या कालवा फुटून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ही नुकसान भरपाई केव्हा मिळेल हे सांगता येत नाही. अधिकारी अशा शेतकऱ्यांच्या मोबदल्याकडे दुर्लक्ष करतात. भूसंपादनाचा, नुकसानीचा मोबदला मिळाल्याशिवाय आम्ही कालवा दुरुस्त करू देणार नाही
- सचिन देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य


0 Comments