सांगोला शहरात रस्त्यावर मुरमीकरणापेक्षा डांबरीकरण करा
सांगोल्यातील नागरिकांची मागणी भुयारी गटारी योजनेचा बोजवारा
भुयारी गटारी योजनेच्या नावाखाली रस्त्यावरील खड्डे बुजवले जात नाहीत. शहर व उपनगरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. शहरांतर्गत रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्यामुळे याचा नाहक त्रास शहरवासियांना सहन करावा लागत आहे. प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याने वाहनधारक व नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असून, रस्ते माती टाकून- मुरमीकरण करून दुरुस्त करण्यापेक्षा नगरपालिका प्रशासनाने शहरातील रस्ते डांबरीकरण करावे, अशी मागणी
सांगोल्यातील नागरिकांनी केली आहे.
रस्ता दुरुस्तीबाबत अनेकदा मागणी केली आहे. नगरपरिषद कार्यालयाकडून या मागणीवर आतापर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. परिणामीउत्सव मंडळांकडून सदर रस्त्याच्या
शहरातील नागरिकांकडून व जयंती दुरुस्तीबाबत सांगोला नगरपालिकेकडे मागणी लावून धरल्यानंतर नगरपालिकेने केवळ खड्ड्यात माती आणि मुरूमटाकून मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला.
परंतु हा प्रयत्न अवघ्या काही दिवसातच फोल ठरला. पुन्हा खड्डे उघडे झाल्याने शहरवासियांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
प्रमुख मार्गात खड्डे, व्यापाऱ्यांची गैरसोय
प्रामुख्याने सांगोला शहरातील जुना कोर्ट रोड ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, नेहरू चौक शनी गल्ली ते वेसपर्यंत, देशपांडे गल्ली ते कुमठेकर घर, शिदोबा मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, भोपळे रोड ते महात्मा फुले चौक, स्टेशन रोड ते नगरपालिका या मार्गावरील रोड मोठ्या प्रमाणात खराब झाले आहेत. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. शहराच्या मध्यभागातून जाणारा प्रमुख मार्ग असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते. या खड्ड्यामुळे वाहनधारकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. व्यापाऱ्यांची गैरसोय होत आहे.


0 Comments