धक्कादायक ...गुटखा न दिल्याने खून.... या गावातील येथील घटना...
नगर : गुटख्याची टपरी हलवावी म्हणून पाठपुरावा केल्याने मुख्याध्यापकावर प्राणघात हल्ला झाल्याची घटना नगर शहरात घडलेली आहे.
या घटनेतील आरोपींना पोलिसांनी अटकही केलेली असून त्याचा तपास सुर आहेत. त्यातच आता पुन्हा गुटख्यावरून एकाचा खून झालेला आहे. त्यामुळे आता गुटखा हद्दपार करण्याची वेळ आली आहे.
गुटखा न दिल्याने एका परप्रांतीय मजुराचा खून झालेला आहे. ही घटना अरणगाव (ता. नगर) शिवारात गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास घडली आहे.
अजय रामरुम चौधरी (वय २२, रा. मूळचा उत्तर प्रदेश, हल्ली मुक्काम अरणगाव, ता. नगर) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी एकावर नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तेजनारायण अर्जुन तांते (मूळ रा. बिहार, हल्ली मुक्काम अरणगाव, ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत शैलेंद्र सुरेश यादव यांनी फिर्याद दिली आहे. अहमदनगर येथील बायपास रस्त्याचे काम सुरू आहे. हे काम जीएचव्ही कंपनीने घेतलेले आहे. या कंपनीत मजूर म्हणून काम करत असलेल्यावरील तांते याने मयत चौधरी याच्याकडे गुटखा मागितला होता.
त्यांनी तो दिला नाही. यातून दोघांमध्ये भांडण झाले. तांतेने जवळच असलेली लाकडी काठी उचलून चौधरी यांच्या डोक्यात घातली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.


0 Comments