google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक! खर्च सादर न केल्याने सोलापूर जिल्ह्यातील 'या' गावाच्या सरपंचासह सहाजणांचे सदस्यत्व रद्द

Breaking News

खळबळजनक! खर्च सादर न केल्याने सोलापूर जिल्ह्यातील 'या' गावाच्या सरपंचासह सहाजणांचे सदस्यत्व रद्द

 खळबळजनक! खर्च सादर न केल्याने सोलापूर जिल्ह्यातील


'या' गावाच्या सरपंचासह सहाजणांचे सदस्यत्व रद्द 

सोलापूर जिल्ह्यातील भंडारकवठे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी झालेला खर्च सादर न केल्याने गावचे सरपंच भीमाशंकर बबलेश्वर यांच्यासह सहा सदस्यांचे सदस्यत्व आशीर्वाद यांनी रद्द केले आहे. यामुळे त्यांना पुढील पाच वर्षे निवडणूक लढविता येणार नाही.

सदस्यत्व रद्द झालेले सर्व सहा जण हे आमदार सुभाष देशमुख समर्थक आहेत. यामुळे यात वरील सहा सदस्य वेगवेगळ्या आमदार सुभाष देशमुख व भाजपला जोरदार झटका बसला आहे.

सरपंच भीमाशंकर कल्लाप्पा बबलेश्वर, सदस्य स्मिता अशोक मुक्काणे, सोमनिंग धरेप्पा कमळे, संगप्पा केला नव्हता. त्यानुसार तक्रारदार कुगणे काशीराम बिराजदार, युक्ता यतीन शहा राजश्री उमेश जंगलगी (सर्व रा. भंडारकवठे, ता. दक्षिण सोलापूर) असे सदस्यत्व रद्द झालेल्या सहा जणांची नावे आहेत.

या प्रकरणात अर्जदार सिद्धेश्वर जिल्हाधिकारी कुमार महादेव कुगणे यांनी सहा जणांच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे सदस्यत्व रद्द करण्याबाबत तक्रार अर्ज केला होता. भंडारकवठे ग्रामपंचायतीची २०२१ मध्ये निवडणूक झाली होती.

प्रभागातून निवडून आले होते. मात्र निवडून आल्यानंतर सहा जणांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे निवडणुकीसाठी झालेला खर्च सादर केला नव्हता. त्यानुसार तक्रारदार कुगणे यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १४, ब (१) नुसार सहा जणांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानंतर याबाबत अर्जदार व समोरची बाजू अशी दोघांची सुनावणी जिल्हाधिकारी यांच्याकडे झाली.

२७ सप्टेंबर २०२३ रोजी यावरती अंतिम सुनावणी झाली. त्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गुरुवारी सर्व सहा जणांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निकाल दिला. या प्रकरणात अर्जदार सिद्धेश्वर महादेव कुगणे यांच्याकडून अॅड. शरद पाटील यांनी तर विरोधी गटाकडून अॅड. मंजुनाथ कक्कळमेली यांनी काम पाहिले.

काँग्रेस व भाजपात टोकाचे राजकारण

भंडारकवठे ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसचे वसंतराव पाटील व विठ्ठल पाटील व भाजपचे भीमाशंकर बबलेश्वर व यतीन शहा असे दोन गट आहेत. दोन्ही गटाकडे स्पष्ट बहुमत नव्हते. त्यामुळे सरपंच निवडणुकीत दोन्ही गटात कमालीची चुरस झाली होती. यात काँग्रेसचे कोटगोंडे सरपंच झाले होते. मात्र कोटगोंडे व कुगणे यांचे सदस्यत्व निवडणुकीचा खर्च सादर न केल्याने १९ जुलै रोजी रद्द झाले होते.

याबाबत भाजप गटाचे रमेश पाटील यांनी तक्रार केली होती. तर भाजप गटाच्या सहा सदस्यांचे सदस्यत्व याच कारणावरून रद्द करण्याची मागणी कुगणे यांनीही केली होती. त्याचा निकाल लागला नव्हता. दरम्यान भाजपचे भीमाशंकर बबलेश्वर हे पाटील गटाच्या चार सदस्यांना फोडून १४ ऑगस्ट रोजी सरपंच झाले.

मात्र या निकालाने बबलेश्वर यांचे दोन महिन्याच्या आतच त्यांचे सरपंच पद गेले. या कुरघोडीच्या राजकारणात एकमेकांविरुद्ध तक्रार केल्याने कॉंग्रेसनंतर भाजपला सत्तेपासून दूर व्हावे लागले. सदस्यत्व रद्द झालेले सर्व सहाजण हे आ. देशमुख समर्थक आहेत.

Post a Comment

0 Comments