महुद प्रा.आ.केंद्र येथे वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सांगोला यांच्या वतीने एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले
जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिर
सांगोला प्रतिनिधी (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
महुद प्रा.आ.केंद्र येथे वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सांगोला यांच्या वतीने एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले
वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने घेण्यात आलेल्या शिबिरामध्ये१५० रूग्णांची मोफत तपासणी करून गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांना सदर योजनेत मोफत उपचारचा सल्ला देण्यात आला.
वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी 24 तास सेवा सुरू आहे महाराष्ट्र शासनाच्या सर्व योजना या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत या हॉस्पिटलमध्ये सर्व रुग्णांवर उपचार व शस्त्रक्रिया केली जात आहे
महाराष्ट्रातील तज्ञ डॉक्टरांची टीम या हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे गोरगरीब रुग्णांना 24 तास या रुग्णालयात मदत केली जात आहे सर्व प्रकारची शस्त्रक्रिया व ऑपरेशन या हॉस्पिटलमध्ये होत आहेत वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये
हाडांच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया शासनाच्या योजनेतून मोफत होत आहेत त्याचबरोबर मूत्राशयाच्या सर्व शस्त्रक्रिया मोफत होत आहेत महाराष्ट्रातील तज्ञ डॉक्टर या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी व रुग्णांना उपचारासाठी येत आहेत
या सह शासनाच्या सर्व योजना व हॉस्पिटल मधील योजनांची माहिती रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली या शिबिरासाठी महूद प्रा.आ.केंद्र चे वैद्यकीय अधिकक्षक डॉ.अविनाश खांडेकर, सहायक अधीक्षक डॉ.पल्लवी राजगुरू, मोरे सिस्टर, बजबळकर परिचारक
तसेच वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे डायरेक्टर डॉ.प्रद्युम्न कुलकर्णी, निकीता सिस्टर, निर्मला सिस्टर,हरिश ब्रदर, सागर ब्रदर आणि डाटा ऑपरेटर एजाज शेख आदी उपस्थित होते.


0 Comments