सांगोला येथे 'मॉल अन् वस्त्र निकेतन' उद्योगातही 'सूर्योदय'चे पदार्पण
विविध उद्योग व बँक क्षेत्रामध्ये सध्या सांगोल्यासह राज्यभर 'सूर्योदय' हे नाव चर्चेत आहे. सांगोल्यात चारजण एकत्रित आले, त्यांनी 'सूर्योदय' नावाने उद्योगाची उभारणी केली.
चौघांनी एक नव्हे, दोन नव्हे तर सध्या सुमारे सतरा ते अठरा उद्योगांची उभारणी एकत्रितपणे यशस्वी करून दाखवली. आता 'मॉल व वस्त्र निकेतन' उद्योगातही 'सूर्योदय'ने पदार्पण केले आहे.
रविवारपासून (ता. १५) घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हा नवीन उद्योग सुरू होणार आहे.'सुर्योदय' हे नाव जितकं मोठं आहे, तितकंच त्याच्या उभारणीत कष्ट घेतलेल्या चौघांची यशोगाथाच दडली आहे. एखादा प्रकल्प किंवा उद्योग एकटा करण्यापेक्षा एकमेकांना सोबत घेऊन
तो यशस्वी करून दाखवणारे या उद्योग समूहाचे संस्थापक अनिलभाऊ इंगवले, सहसंस्थापक जगन्नाथ भगत, डॉ. बंडोपंत लवटे व सुभाष दिये हे आहेत. यातील तिथे तालुक्यातील मेडशिंगी व एकजण वाढेगाव येथील असून,
यापैकी अनिल इंगवले व बंडोपंत लवटे राजकारण, चळवळ व दूध व्यवसायात सक्रिय तर जगन्नाथ भगत व सुभाष दिये हे दोघे शिक्षक होते. आपल्या शिक्षकी पेशाचा राजीनामा देऊन या क्षेत्रात ते पूर्णवेळ कार्यरत आहेत. सुरवातीला बचत गट,
पतसंस्था, दूध डेअरी, बैंकिंग क्षेत्र, कृषी उद्योग व त्यानंतर इतर अनेक उद्योगांत सूर्योदय सध्या मोठ्या नावारूपाला आले आहे. सन २०१० पासून आज २०२३ पर्यंत या समूहाने अनेक उद्योग आणि व्यवसायात गरुडझेप घेतली आहे.
सांगोल्यात वाडेगाव नाक्याजवळील मंगळवेढा रोडवर 'सूर्योदय मॉल व वस्त्र निकेतन' या नावाने नवीन मॉल व कापड व्यवसायाची सुरवात त्यांनी केली आहेसूर्योदय समूहातील विविध उद्योग व स्थापना वर्ष
सूर्योदय गोल्ड फायनान्स, मेडशिंगी- २०१०, सूर्योदय बचत गट, मेडशिंगी- २०११, सूर्योदय सूर्यकिरण निधी लिमिटेड- २०१५, सूर्योदय अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी,
सांगोला- २०१७, सूर्योदय महिला अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी, सांगोला- २०१९, सूर्योदय शूटिंग अँड शर्टिंग, सांगोला - २०१९, सूर्योदय व्यापारी संकुल, मेडशिंगी- २०२०, सूर्योदय दूध संकलन केंद्र, मेडशिंगी- २०२०,
सुपर सूर्योदय अॅग्रो अँड मिल्क इंडस्ट्रीज प्रा.लि. मेडशिंगी- २०२० सूर्योदय म्हैस दूध सेंटर, सांगोला- २०२०, ओम सूर्योदय अँग्रो प्रोड्यूसर कंपनी, सांगोला, सूर्योदय ज्वेलर्स, सांगोला- २०२०, सूर्योदय लीलन हाऊस,
सांगोला- २०२२. कृष्णा दूध शीतकरण केंद्र, लंवगी, ता. मंगळवेढा- २०२२, न्यू सूर्योदय दूध शीतकरण केंद्र, खर्डी, ता. पंढरपूर- २०२२, सूर्योदय ब्रँड लुक मेन्स वेअर, सांगोला- २०२२, सूर्योदय मोटर्स ई-बाईक शोरूम, सांगोला- २०२२, सूर्योदय मॉल व वस्त्र निकेतन, सांगोला- २०२३


0 Comments