google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज..राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी पुन्हा एकदा दीपक साळुंखे-पाटील

Breaking News

ब्रेकिंग न्यूज..राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी पुन्हा एकदा दीपक साळुंखे-पाटील

 ब्रेकिंग न्यूज..राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या


सोलापूर जिल्हाध्यक्षपदी पुन्हा एकदा दीपक साळुंखे-पाटील  

अजित पवार गटाच्या सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सांगोला - अजित पवार गटाच्या सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते मुंबई येथील पक्ष कार्यालयात गुरुवार (ता. १२) रोजी नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी याअगोदर सलग ८ वर्षे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्षपद भूषविले आहे. याशिवाय ६ वर्षे विधान परिषदेचे आमदार, ४ वर्षे राज्याचे उपाध्यक्षपद आणि ३ वर्षे नवी मुंबईचे निरीक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

 देशात सर्वात जास्त चर्चेत असलेल्या माढा लोकसभा निवडणुकीत प्रचार प्रमुख म्हणून त्यांनी यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडली आहे.

पक्षात अनेक वर्षे महत्त्वाची पदे यशस्वीरित्या सांभाळून सोलापूर जिल्ह्यात पक्ष संघटना बळकट करण्यात सिंहाचा वाटा असलेले माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांची पुनश्च जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

यावेळी माजी खासदार व मुंबईचे अध्यक्ष समीर भुजबळ, पक्षाचे कार्यालयीन सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रवक्ते उमेश पाटील, कार्यालयीन कोषाध्यक्ष संजय बोरगे, सुरेश आबा पालवे, प्रमोद साळुंखे आदी उपस्थित होते.

पुन्हा एकदा मला जिल्हाध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली आहे. अजितदादा व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यात नव्या जोमाने राष्ट्रवादी बळकट करण्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेन. मला ज्या विश्वासाने या पदाची जबाबदारी दिली आहे त्या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही.

- दीपक साळुंखे पाटील, नूतन जिल्हाध्यक्ष, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस.

Post a Comment

0 Comments