google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक प्रकार.. ! गौतमीच्या लावणीला आला साप !

Breaking News

खळबळजनक प्रकार.. ! गौतमीच्या लावणीला आला साप !

खळबळजनक प्रकार.. ! गौतमीच्या लावणीला आला साप !


प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या लावणीची भुरळ एक सापालाही पडली आणि तिच्या लावणीच्या कार्यक्रमाला सापाने हजेरी लावली. यामुळे भर कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला. 

गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि गोंधळ या बाबी आता एका नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. तिच्या बहुतेक कार्यक्रमात प्रेक्षकांचा गोंधळ होतो, प्रेक्षक हुल्लडबाजी करतात 

आणि कित्येकदा पोलीसानाही हस्तक्षेप करावा लागतो. या आधीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे तर गणेशोत्सवात काही ठिकाणी पोलिसांनी तिच्या कार्यक्रमावर बंदीही घातली आहे.

 गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ हा ठरलेलाच असला तरी यावेळी कारण मात्र वेगळे आहे. गौतमीचा कार्यक्रम ऐन रंगात आलेला असताना थेट एका सापाची एन्ट्री झाली आणि प्रेक्षकाची तारांबळ उडाली. या संपामुळे एक वेगळाच गोंधळ गौतमीच्या कार्यक्रमात झाला.

मुंबईत कामोठे मानसरोवर रेल्वे स्थानकाच्या जवळ गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गौतमी पाटील म्हटलं की प्रेक्षकांची गर्दी होतच असते. महाराष्ट्रात तिचे चाहतेही मोठ्या प्रमाणात आहेत.

 या कार्यक्रमाला देखील अशीच मोठी गर्दी झाली होती. कार्यक्रमाला प्रतिसाद अपेक्षेप्रमाणे मिळाला होता. यावेळी एका सापाला देखील गौतमीच्या लावणीची भुरळ पडली असल्याचे दिसले. या कार्यक्रमाला एका सापाने हजेरी लावली.

 अशा कार्यक्रमाच्या ठिकाणी सापाने प्रवेश केल्यावर कशा प्रकारे गोंधळ होऊ शकतो याचा कुणालाही सहज अंदाज येऊ शकतो. दरम्यान एका सर्पमित्राने तातडीने हा साप पकडला त्यामुळे पुढील अनर्थ टळला. 

गर्दीत साप शिरल्याने लोकांची धावपळ होऊन, चेंगराचेंगरी होण्याची भीती होती तसेच सर्पदंश होण्याचीही परिस्थिती होती परंतु काही वेळात सगळे काही व्यवस्थित झाले आणि कार्यक्रम पुन्हा सुरु झाला.

Post a Comment

0 Comments