google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक घटना ...चुलत भावानेच काढला भाऊ - भावजयीचा काटा……

Breaking News

धक्कादायक घटना ...चुलत भावानेच काढला भाऊ - भावजयीचा काटा……

धक्कादायक घटना ...चुलत भावानेच काढला भाऊ - भावजयीचा काटा……


दुहेरी खूनाने अख्खा माण तालुका हादरला….आंधळी ता. माण येथील चुलत भावानेच काढला भाऊ - भावजयीचा काटा……आरोपी चार तासाच्या आत गजाआड 

दहीवडी : माण तालुक्यातील आंधळी येथे एका दाम्पत्याचा धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. या घटनेने माण तालुक्यात एकच खळबळ उडाली पूर्व वैमनस्यातून चुलत भावानेच हे हत्याकांड केल्याचे उघड झाले असून.

 तपासाची चक्रे गतिमान करत पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले. संजय रामचंद्र पवार (वय-५०) व मनीषा संजय पवार (वय-४५) अशी मृतांची नावे असून बापूराव शहाजी पवार असे आरोपीचे नाव आहे.

पवार दाम्पत्य शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास लाईट आल्यानंतर शेतात पिकांना पाणी देण्यासाठीण्यासाठी गेले असता त्याने धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार करून त्यांची हत्या केली.

सकाळी अचानक लोक जमा झाल्याने हा खूनाचा प्रकार पोलिसांना समजला. सकाळी नऊ वाजल्यापासून दहिवडी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. यावेळी श्वान पथकही पाचारण करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखेचेही कर्मचारी उपस्थित होते.

घटनास्थळी संजय रामचंद्र पवार (वय-५०) व मनीषा संजय पवार (वय-४५) यांचे धारदार शस्त्राने शेतात खून झालेल्या स्थितीतील मृतदेह पडलेले होते.

या दोघांचा खून करून संशयित आरोपी बापूराव शहाजी पवार हा फरार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळाल्यापासून दहिवडी पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे गतिमान करत त्याचा माग काढला.

 त्यानुसार पहिल्यांदा तो फलटण येथे असल्याचे समजले,मात्र त्यानंतर तो फलटणहून येऊन आंधळी परिसरातच असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. पूर्व वैमनस्यातून आणि वादातून त्याने हा खून केल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले.

घटनेची माहिती मिळाल्यापासून अवघ्या काही तासातच पोलिसांनी आरोपीस शिताफीने पकडले.

Post a Comment

0 Comments