सांगोला तालुक्यातील माजी आमदार दीपक साळुंखे गाजवणार यंदा विधानसभेचे मैदान!
सांगोला:- प्रत्येक निवडणुकीत रणांगणाच्या बाहेर राहून किंगमेकरची भूमिका बजावणाऱ्या दीपक साळुंखे-पाटील यांना पुन्हा आमदार होण्याची तीव्र इच्छा झाली आहे.
शहाजी पाटील आपल्यामुळेच आमदार झाले, असे विधान करून त्यांनी शहाजीबापूंना डिवचले आहे. त्यामुळे दीपक साळुंखे-पाटील प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणांगणात उतरुन मैदान गाजवणार की काय, याविषयी त्यांच्या समर्थकांमध्ये उत्सुकता लागली आहे.
२०१४ पर्यंत दीपक साळुंखे यांनी दिवंगत माजी आमदार गणतराव देशमुख यांना सातत्याने पाठिंबा दिला होता. १९९० मध्ये गणपतराव देशमुख हे १६ हजार ३१८ मताधिक्यांनी विजयी झाले होते तर १९९५ ला गणपतराव यांचा पराभव करुन शहाजीबापू हे केवळ १९२ मताधिक्यांनी विजयी झाले होते.
त्यानंतर २००९ मध्ये ९ हजार ८०४ आणि २०१४ मध्ये २५ हजार २२४ मतांची आघाडी घेऊन गणपराव यांनी शहाजीबापूंचा पराभव केला होता. प्रत्येक निवडणुकीत पक्षाचा आदेश नसला तरी दीपक साळुंखे यांची गणपतराव यांना साथ मिळत होती.
२०१९ मध्ये शेकापचे डॉ. अनिकेत देशमुख यांना पाठिंबा देण्याचा राष्ट्रवादीचा आदेश असतानाही दीपक साळुंखे यांनी शहाजीबापूंना पाठिंबा देऊन त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर केला. मात्र, पाटील हे ७६८ मताधिक्यांनीविजयी झाले. त्यांना पोस्टल मतांनी तारले.
अलीकडेच एका कार्यक्रमात दीपक साळुंखे यांनी आमदार शहाजीबापू हे माझ्या प्रयत्नामुळेच निवडून आले, असे विधान केले आहे. आगामी निवडणुकीत शहाजीबापू, दीपक साळुंखे आणि शेकापचे डॉ. अनिकेत देशमुख यांची तिरंगी लढत
सांगोला एम. एम. पठाण
झाली तर निकाल वेगळा लागू शकतो. आजपर्यंत दीपक- साळुंखे यांनी जनतेतून एकही निवडणूक लढवली नाही.
केवळ सोयीच्या दृष्टीने किंगमेकरची भूमिका ते बजावतात. संघटन कौशल्य असल्यामुळे त्यांनी जनतेतून निवडणूक लढवून राजकीय ताकद दाखवून द्यावी, अशी त्यांच्या समर्थकांची अपेक्षा आहे.
दोन पाटलांमधील हा वाद उफाळून आला असला तरी आमदार पाटील यांनी अलीकडेच तालुक्याच्या विकासासाठी सुमारे दीड हजार कोटींचा निधी मिळविला आहे. त्यातून विकासकामे मार्गी लागली आहेत.
विधानसभेच्या निवडणुकीला दहा महिन्यांचा अवकाशअसून लोकसभा निवडणुकीचे लवकरच पडघम वाजणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर साळुंखे-पाटील यांनी आमदारकीची सुप्त इच्छा प्रकट करून स्वतंत्र लढणार असल्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रीय पातळीवरील इंडिया आघाडीमध्ये शेकाप समाविष्ट आहे.
त्यामुळे आघाडीची ताकद शेकापचे डॉ. अनिकेत देशमुख व त्यांचे बंधू डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या पाठीशी राहील. २०१९ मधील पराभवाचे शल्य कायम असल्यामुळे शेकाप मोठ्या ताकदीने लढू शकतो. मात्र, दिवंगत गणपतराव देशमुख यांच्यानंतर थंडावलेली चळवळ पुन्हा गतिमान करण्याची आवश्यकता आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार तसेच शिवसेना ठाकरे गट व धनगर समाजाचे नेते हरिभाऊ पाटील हेसुध्दा विधानसभेला भविष्य अजमावू शकतात. त्यामुळे सांगोला विधानसभेची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.
मोबा. ९४२३३३६८५५
0 Comments