google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज.... डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाने घेतली माघार!

Breaking News

ब्रेकिंग न्यूज.... डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाने घेतली माघार!

ब्रेकिंग न्यूज.... डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाने घेतली माघार!


सांगोला/ प्रतिनिधी : सांगोला शहरातील डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाने अखेर माघार घेतली आहे. प्राचार्य सचिव आणि संस्थेतील सर्व कारभार बघणारे महाविद्यालयाचे क्लार्क ठोंबरे आणि बनकर यांनी संगणमताने शरणप्पा हेगडे यांना बेकायदेशीररित्या 58 व्या वर्षी रिटायर केले होते. 

याविरुद्ध शरणप्पा हेगडे यांनी मा उच्च न्यायालय मुंबई येथे धाव घेत यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार मा.उच्च न्यायालय मुंबई यांनी शरणप्पा हेगडे यांच्या बाजूने निकाल देत संस्थेला दणका दिला आहे. 

त्यामुळे संस्थेने शरणप्पा हेगडे यांच्यापुढे माघारच घेतली आहे असे स्पष्ट दिसून येते. संस्थेचे क्लार्क ठोंबरे आणि बनकर यांच्या कुरघोडीच्या कारभारामुळे आज संस्थेवर ही वेळ ओढावली आहे 

अशी जोरदार चर्चा सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामध्ये सुरू आहे. तसेच या दोघांचे तात्काळ राजीनामे घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सर्व शिक्षकांनी केली आहे.

मा. उच्च न्यायालयाने शरणप्पा हेगडे यांना तात्काळ रुजू करून घेण्याचे आदेश दिले होते परंतु

रुजू करून घेण्याच्या प्रक्रियेला संस्थेकडून मुद्दामून टाळाटाळ सुरू होती. दरम्यान हेगडे यांच्याकडून अवमान याचिका दाखल करणार अशी माहिती मिळताच संस्थेतील सर्व पदाधिकारी एकत्र येत तात्काळ बैठक घेत शरणप्पा हेगडे यांना सन्मानपूर्वक संस्थेत पुन्हा रुजू करून घेतले आहे. 

रुजू झाल्यानंतर संस्थेतील इतर शिक्षक सहकाऱ्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये फेटा बांधून सत्कार केला. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शरणप्पा हेगडे यांच्या बाजूने हा 12 वा निकाल असून संस्था अजून यांच्यापुढे किती वेळा झुकणार असा सवाल शिक्षक संघटनांनी उपस्थित केला आहे. तसेच पुढील काळात जर संस्थेकडून कोणत्याही प्रकारचा त्रास दिला

 तर सर्व शिक्षक संघटना संस्थेच्या विरोधात आंदोलन करून क्लार्क यांच्या कारवाई केल्याशिवाय गप्प बसणार नाही असा असा इशाराही शिक्षक संघटनेने दिला आहे.

संस्थेकडून विविध प्रकारे त्रास देण्याचे सत्र सुरू होते तसेच इतर अनेक कर्मचाऱ्यांना नाहक त्रास दिला जात आहे. मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार माझा पुन्हा एकदा विजय झाला आहे. 

आमचा न्यायदेवतेवर पूर्णपणे विश्वास आहे म्हणून आज पर्यंत 12 वेळा आमच्या बाजूने निकाल न्यायालयाने दिले आहेत. “न्याय हा एक ना एक दिवस नक्की मिळतो परंतु त्यासाठी संघर्ष करावा लागतो” 

आणि हा संघर्ष आम्ही आज तागायत केला. आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी गेल्या 23 वर्षापासून ही लढत देत असून महाराष्ट्रातील एकमेव घटना आहे. 23 वर्षानंतर विजय हा झाला असून आम्ही न्याय देवतेचे ऋणी आहोत.

– शरणप्पा हेगडे (ग्रंथपाल)

( दैनिक सांगोला नगरी इम्पॅक्ट ) गोल करून घ्यावे..

Post a Comment

0 Comments