google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आटपाडी : अल्पवयीन मुलीवर बलात्कार : आरोपी विरुद्ध आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल

Breaking News

आटपाडी : अल्पवयीन मुलीवर बलात्कार : आरोपी विरुद्ध आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल

आटपाडी : अल्पवयीन मुलीवर बलात्कार : आरोपी विरुद्ध आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल


 आटपाडी तालुक्यातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर बलत्कार करणाऱ्या तडवळे रामनगर येथील युवकावर आटपाडी पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक अशी, यातील फिर्यादी ही अल्पवयीन असून कोरोना कालावधीत मामाकडे राहण्यास होती. यावेळी तीचे शेजारी राहणाऱ्या आरोपी स्वप्निल नानासो गिरी याच्याशी ओळख झाली. 

यावेळी आरोपीने फिर्यादीशी ओळख वाढवत तिला आपल्या जाळ्यात ओढले. जून २०२० मध्ये फिर्यादी ही मामाचे घरी कार्यक्रम असल्याने आली होती.

 त्यावेळी आरोपीने फिर्यादीवर आपण लग्न करूया असे म्हणत दबाव टाकत लैंगिक अत्याचार करत फिर्यादीशी शारीरिक संबंध प्रस्तापित केले.

त्यानंतर फिर्यादी ही मुंबईला गेली. सप्टेंबर २०२२ मध्ये आरोपी हा मुंबईला गेला. त्यावेळी आरोपीने फिर्यादी हिला भेटायला बोलावले. यावेळीही आरोपीने फिर्यादीवर नको म्हणत

 असताना लैंगिक अत्याचार करत फिर्यादीशी शारीरिक संबंध प्रस्तापित केले. यानंतर आरोपीचे दुसऱ्या मुलीबरोबर लग्न ठरले असल्याचे समजताच फिर्यादीने आरोपीला याचा

 जाब विचारताच आरोपीने फसविल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादीने आरोपी विरुद्ध दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Post a Comment

0 Comments