google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक..आईचा वारंवार छळ करायचे; मुलाला बघवलं नाही, भररस्त्यात व्यसनी पित्याला गाठलं, अन् धक्कादायक कृत्य केलं

Breaking News

खळबळजनक..आईचा वारंवार छळ करायचे; मुलाला बघवलं नाही, भररस्त्यात व्यसनी पित्याला गाठलं, अन् धक्कादायक कृत्य केलं

 खळबळजनक..आईचा वारंवार छळ करायचे; मुलाला बघवलं नाही,


भररस्त्यात व्यसनी पित्याला गाठलं, अन् धक्कादायक कृत्य केलं

नागपूर शहरातील बजाज नगर पोलीस ठाण्यांतर्गत एका मुलाने आपल्या मद्यधुंद पित्याची धारदार चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना सुभाष नगर टी-पॉइंट येथे घडली आहे. या प्रकरणी बजाज नगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय शंकरराव निधीकर( रा. सुभाष नगर) असे मृतकाचे नाव आहे. संजय हा सेक्युरिटी गार्ड म्हणून काम करायचा. त्याला दारूचे व्यसन होते. मृतकची पत्नी आणि तिचा मुलगा मृतक संजयपासून वेगळे राहत होते. 

मृतकची पत्नी आपल्या माहेरी आपल्या मुलगा सहिलसोबत पांडाराबोडी येथे राहत होती. साहिलची आई घराघरात भांडी आणि कपडे धुण्याचे काम करते. आरोपी मुलगा साहिल हा चना पोहे विकून आईचा आणि आपला उदरनिर्वाह करायचा.

तर दुसरीकडे, मृतक संजय अनेकदा दारू पिऊन पत्नीला बेदम मारहाण करायचा. यामुळे दोघेही वेगळे राहत होते. मात्र त्यांचा घटस्फोट झाला नव्हता. मृतकाचा मुलगा साहिल निधीकर हा अनेक दिवसांपासून आईवर वडिलांकडून होत असलेला अत्याचार पाहत होता. 

मृतक हा अनेकदा दारू पिऊन पत्नीला बांधून मारहाण करत असे. काल रात्री देखील मृतक संजय दारू पिऊन सासरच्या घरी गेला होता. तिथे पत्नीला शिवीगाळ करत पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली.

 मृताने पत्नीच्या पोटावर लाथ मारली आणि आरोपी साहिलने हे पाहिले. यानंतर मृतक तेथून निघून गेला. वडिलांनी आईच्या पोटात लाथ मारल्याचा राग आरोपी मुलाने ठेवला. साहिलने दारू प्यायली आणि वडिलांना मारण्याच्या उद्देशाने वडिलांचा शोध सुरू केला.

आरोपी साहिलने वडिलांना आयटी पार्कजवळ पाहिले आणि त्याचा पाठलाग केला. अखेर विवेकानंद स्मारकाजवळ साहिलने वडिलांना अडवले. त्यानंतर छाती आणि मानेवर वार करून त्यांची हत्या केली.

 घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्याला उपचारासाठी वैद्यकीय रुग्णालयात नेले असता त्यात त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, मृताची पत्नी आणि लहान मुलगाही मेडिकलमध्ये उपस्थित होते. 

मात्र साहिल तेथून बेपत्ता होता. यावरून पोलिसांना संशय आला आणि त्यांनी साहिलचा शोध सुरू केला. अखेर पोलिसांनी आरोपी साहिलला त्याच्या हिंगणा येथील मावशीच्या घरातून अटक केली.

Post a Comment

0 Comments