google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्ह्यात खळबळजनक घटना...सासऱ्याच्या शेतात जावयाची गळफासाने आत्महत्या

Breaking News

सोलापूर जिल्ह्यात खळबळजनक घटना...सासऱ्याच्या शेतात जावयाची गळफासाने आत्महत्या

सोलापूर जिल्ह्यात खळबळजनक घटना...


सासऱ्याच्या शेतात जावयाची गळफासाने आत्महत्या

सोलापूर - अज्ञात कारणावरून एका जावयाने सासर्‍याच्या शेतातील पत्रा शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना विजापूर रोड येथील प्रताप नगर शिवारात शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली.

 संतोष श्रीमंत चाबुकस्वार ( वय 25 वर्ष, रा. माळी गल्ली, सोरेगाव, सोलापूर ) असे त्या गळफास घेतलेल्या जावयाचे नाव आहे. 

त्यांनी प्रताप नगर शिवारातील त्यांचे सासरे करेप्पा सोमलिंग कोटीवाले यांच्या शेतातील पत्रा शेड मधील लोखंडी पाईपला दोरीच्या साह्याने गळफास घेतला

 असल्याचे शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता आढळून आले. त्याला नातेवाईकांच्या साह्याने खाली उतरून येथील

 शासकीय रुग्णालयात विजापूर नाका पोलीस ठाण्याचे हवलदार व्हि डी घुगे यांनी रात्री दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Post a Comment

0 Comments