स्व .डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला येथे
विद्यार्थ्यांची आचारसंहीता या विषयावर मार्गदर्शन
सांगोला (प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे): डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला येथे शालेय प्रशासन व आय क्यू ए सी विभागाकडून
महाविद्यालयातील सीनियर कॉलेज विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण माहिती मिळावी यासाठी व कायदेशीर माहिती अवगत असावी यासाठी अॅड. अयुब पटेल यांचे मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
कोड ऑफ कंडक्ट म्हणजेच विद्यार्थ्यांची आचार संहीता व त्यातील तरतुदी यांची माहीती देत थोडक्यात व सुंदर असे मार्गदर्शन केले.
मानव जन्म प्रवास ते शालेय जीवना पर्यंत कायदेशीर अधिकार ,जगण्याची पद्धत व शालेय जीवनातील कायदेशीर बाबी व त्याचे परिणाम यावर माहिती दिली.
यावेळी समन्वयक डॉ. शंकर धसाडे यांनी ही आपले विचार मांडत विद्यार्थ्यांना कायदेशीर ज्ञान गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ.सिकंदर मुलाणी
यांनी महाविदयालयात लेक्चरर करीता आचार संहीता व विदयार्थ्यांची आचार संहीताचे तंतोतंत पालन होत असलेचे सांगुन मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास कमिटी चेअरमन प्रा. डॉ. भुपाल पाटील उपस्थित होते. यावेळी प्रा. अक्षय माने यांनी या कार्यक्रमाचे थोड्या कालावधीत योग्य नियोजन करत
यापुढील काळात विद्यार्थ्यांना कायदेशीर ज्ञान गरजेचे असलेचे सांगत सर्व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास महाविदयालयीन विदयार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
0 Comments