google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 नगरसेवक परिषद मुंबई महाराष्ट्र असोशियनच्या प्रदेश उपाध्यक्षपदी सतीश सावंत यांची निवड

Breaking News

नगरसेवक परिषद मुंबई महाराष्ट्र असोशियनच्या प्रदेश उपाध्यक्षपदी सतीश सावंत यांची निवड

 नगरसेवक परिषद मुंबई महाराष्ट्र असोशियनच्या प्रदेश


उपाध्यक्षपदी  सतीश सावंत यांची निवड

सांगोला/प्रतिनिधी (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे)

नगरसेवक परिषद मुंबई महाराष्ट्र असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी सांगोला नगरपालिकेचे मा.नगरसेवक सतीश भाऊ सावंत यांची निवड करण्यात आली.

नाशिक येथे काल रविवार दिनांक 10 रोजी राष्ट्रीय नगरसेवक परिषद मुंबई महाराष्ट्र व राष्ट्रीय जिल्हा परिषद राष्ट्रीय जिल्हा परिषद असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ. कैलास गोरे पाटील व राष्ट्रीय नगरसेवक परिषद मुंबई असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष रामभाऊ जगदाळे, प्रदेशाध्यक्ष दिनकर अण्णा पाटील.जिल्हा परिषद असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष पंकज रहा गडाले यांच्या उपस्थितीत राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या निवडी पार पडल्या.

असोसिएशनच्या निवडी संपन्न झाल्या.

ही संघटना भारतामध्ये 24 राज्यांमध्ये कार्यरत आहे. या संघटनेचे 24 राज्यांमध्ये पदाधिकारी काम करत असून या संघटनेमध्ये जिल्हा परिषद सदस्य ,जिल्हा परिषद अध्यक्ष, नगराध्यक्ष ,नगरसेवक ,पंचायत समिती सभापती, पंचायत समिती सदस् काम करीत आहेत.

सांगोला शहर व तालुक्यातील नागरिकांना कोरोनाच्याा काळामध्ये रात्रंदिवस मदत केली आहे. सांगोला नगरपरिषदेचे कर्तव्यदक्ष व लोकप्रिय माजी नगरसेवक सतीश भाऊ सावंत यांनी आतापर्यंत सांगोला शहरात अतिशय उत्कृष्टपणे काम करून शहरवासीयांचे प्रश्न सडेतोड मांडू त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली आहे सांगोला शहरातील नागरिकांसाठी ते अहोरात्र काम करीत आहे.

सतीश भाऊ सावंत यांचे उत्कृष्टपणे असलेले काम पाहून त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केलेली आहे.

राज्यातील राज्य पातळीवरील नगरसेवकांचे व नागरिकांचे प्रश्न नगर विकास खात्यामार्फत सोडवण्यासाठी व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न ग्रामविकास मंत्रालयामार्फत सोडवण्यासाठी ही संघटना कार्यरत केली आहे

त्यांच्या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

सतीश भाऊ सावंत यांनी निवडीनंतर प्रतिक्रिया देताना नगरसेवकांची ही संघटना राज्यभर बळकट करून नागरिकांचे व नगरसेवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले

यावेळी या कार्यक्रमाला  महिला प्रदेशाध्यक्षा सारिका गाखरे  प्रदेशाध्यक्ष दिनकर अण्णा पाटील,जालन्याचे विष्णू पाचफुले ,एडवोकेट धनंजय लिगाडे, कैवल्य साळुंखे, सौरभ पाखरे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments