google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कोपर्डी प्रकरणातील आरोपी पप्पू शिंदे याची येरवडा जेलमध्ये आत्महत्या, गळफास घेऊन जीवन संपवलं

Breaking News

कोपर्डी प्रकरणातील आरोपी पप्पू शिंदे याची येरवडा जेलमध्ये आत्महत्या, गळफास घेऊन जीवन संपवलं

 कोपर्डी प्रकरणातील आरोपी पप्पू शिंदे याची येरवडा जेलमध्ये आत्महत्या, गळफास घेऊन जीवन संपवलं


पुणे : राज्याला हादरवून टाकणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी पप्पू शिंदे याने येरवडा कारागृहात आपलं जीवन संपवलं. पहाटे गळफास घेऊन त्याने आपल्या आयुष्याला पूर्णविराम दिला. सुमारे पाच वर्षांपासून तो येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत होता.

 कोपर्डीतील शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी त्याच्यासह तीन आरोपींना नगर जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी २०१७ ला दोषी ठरविलं होतं.

 दरम्यान एवढ्या मोठ्या हत्याकांडातील मुख्य आरोपी गळफास घेऊन आत्महत्या करतो, तेव्हा जेल प्रशासन काय करत होतं? असा सवाल आता उपस्थित होतोय.

आरोपी जितेंद्र शिंदे याने आज पहाटेच्या सुमारास गळफास घेतल्यानंतर काही वेळातच ही माहिती तुरुंग प्रशासनाला कळाली. त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी तिथे जाऊन पाहणी केली. 

तुरुंग अधिकारी अमिताभ गुप्ताही थोड्या वेळातच येरवडा कारागृहात पोहोचणार आहेत. दरम्यान, आरोपी जितेंद्र शिंदे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात नेल्याची माहिती आहे.

Post a Comment

0 Comments