आटपाडी श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयात
एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन संपन्न
आटपाडी श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयात आटपाडी व वाणिज्य ली होती या कार्यशाळेसाठी 114 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. किशोर जाधव यांनी केले.
विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयाची माहिती व्हावी व त्यांच्या ज्ञानात भर पडावी हा कार्यशाळा आयोजन करण्याचा उद्देश स्पष्ट केला.श्री पोपट बालटे विकास अधिकारी एलआयसी ऑफ इंडिया शाखा आटपाडी यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विमा क्षेत्रात असलेल्या करिअरच्या संधी उपलब्ध आहेत याविषयी माहिती दिली .सार्वजनिक जीवनामध्ये विम्याचे महत्त्व विशद केले. या कार्यशाळेत त्यांनी विमा ही कल्पना समाजाला नवीन नाही अनुपेक्षित कारणामुळे मालमत्ता अगर जीवित आला होणाऱ्या नुकसानीची शक्यता
असणाऱ्या व्यक्तींनी एकत्र येऊन निधी तयार करून त्यातून प्रत्यक्ष नुकसान होईल त्याची भरपाई करायची या विम्यामागील मूलभूत कल्पनेची निर्मिती सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी बेबीलोन सांस्कृतिक झाली .असे नमूद केले काळाच्या ओघात विमा या कल्पनेचा विकास झाला.
व्यापार व उद्योगाच्या विकासाबरोबर व विशेषता औद्योगिक क्रांतीनंतर विमा व्यवसाय करणाऱ्या संस्थांचा विकास झाला .विमा ही नुकसान भरपाई ची कल्पना मानवी अगर मालमत्तेला होणाऱ्या नुकसान भरपाईची करण्यापर्यंत मर्यादित न राहता भविष्यकाळाची तरतूद करणे
मुला मुलींच्या शिक्षणाची तरतूद निवृत्तीनंतरच्या आयुष्यात नियमित उत्पन्न प्राप्ती यासाठी विम्याची आवश्यकता नमूद केली अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव भोसले होते त्यांनी अध्यक्ष मनोगत मनोगत व्यक्त करत असताना वाणिज्याच्या दृष्टिकोनातून विम्याचे महत्त्व विशद केले
विमा हे सामाजिक सुरक्षिततेचे साधन असे नमूद केले . तसेच विम्याचा इतिहास सांगितला सदर कार्यशाळेचे आयोजन वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख डॉ. किशोर जाधव व अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ऋतुजा कुलकर्णी व प्राध्यापक प्रसाद माळी यांनी केले
श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय आटपाडी वाणिज्य व अर्थशास्त्र विभागच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल पेमेंट व सायबर सेक्युरिटी अवेअरनेस या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते .
या कार्यशाळेत 112 विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. किशोर जाधव यांनी केले तसेच कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. ऋतुजा कुलकर्णी यांनी केले.
या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. नेताजी दबडे रिसर्च फेलो वाणिज्य व व्यवस्थापन विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर हे होते. त्यांनी याप्रसंगी त्यांनी कॅशलेस पेमेंट यावर माहिती दिली. तसेच कॅशलेस पेमेंटचा परिचय करून दिला. कॅशलेस पेमेंट चे फायदे काय आहेत हे विद्यार्थ्यांना परिचय करून दिला.
कॅशलेस पेमेंटच्या आणि प्रकार यावर प्रकाश टाकला. डिजिटल वॅलेट याबाबत सविस्तर माहिती दिली. युएसआयडी हे वापरावे हे सांगितले. दुसऱ्या सत्रामध्ये सायबर सुरक्षा या विषयावर माहिती दिली सध्याच्या काळात सायबर सुरक्षा का महत्त्वाची आहे
या विषयावर सविस्तर माहिती दिली सायबर सुरक्षेचे प्रकार सांगितले सायबर हल्ल्यापासून आपले संरक्षण कसे करावे हे अवगत केले सायबर डोम परियोजना काय आहे ही याच्याबद्दल माहिती दिली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव भोसले होते त्यांनी कॅशलेस अर्थव्यवस्थेची आव्हाने काय आहेत
बाबत माहिती दिली तसेच कॅशलेस इंडिया म्हणजे काय कॅशलेस पेमेंट चे फायदे कोणते व तोटे कोणते याबाबत विद्यार्थ्यांना अवगत केले. या कार्यशाळेचे आयोजन डॉ. किशोर जाधव वाणिज्य विभाग प्रमुख व डॉ. ऋतुजा कुलकर्णी अर्थशास्त्र विभाग प्रमुख व प्रा.प्रसाद माळी यांनी केले
0 Comments