google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी...सोलापूर जिल्हा परिषदेत तोडफोड, पंढरपूरच्या दोघांसह चौघांना अटक !

Breaking News

मोठी बातमी...सोलापूर जिल्हा परिषदेत तोडफोड, पंढरपूरच्या दोघांसह चौघांना अटक !

मोठी बातमी...सोलापूर जिल्हा


परिषदेत तोडफोड, पंढरपूरच्या दोघांसह चौघांना अटक !

सोलापूर जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांचा दालनाची तोडफोड केल्याप्रकरणी सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ): सोलापूर जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांचा दालनाची तोडफोड केल्याप्रकरणी सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यात पंढरपूर तालुक्यातील दोघांसह चौघांना अटक करण्यात आली आहे.

धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी नुकतेच सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहावर, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळण्यात आला होता. यावेळी येथे बराच राडा झाला होता. 

भाजपच्या उपस्थित पदाधिकाऱ्यानी धनगर समाज कार्यकर्त्यांना यावेळी माराहाण देखील केली होती. पालकमंत्री विखे पाटील यांनी मात्र मनाचे मोठेपण दाखवत, गुन्हा दाखल करू नये असे आदेश पोलिसांना दिले होते.

 या घटनेनंतर सोमवारी   सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या दालनात मोठा राडा करण्यात आला. धनगर समाजाच्या जागा भरल्याशिवाय शिक्षकांची भरती करण्यात येऊ नये अशा घोषणा देत मनीषा आव्हाळे यांच्या दालनाची तोडफोड करण्यात आली. 

कार्यालयातील शिपाई राम भैरू चव्हाण यांना यावेळी दमदाटी, शिवीगाळ आणि मारहाणही करण्यात आली. त्यामुळे सात जणांच्या विरोधात सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चौघांना अटक झाली असून उर्वरित तिघांचा शोध पोलीस घेत आहेत. 

जिल्हा परिषदेत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक सुरु असतानाच काही जण मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या दालनासमोर आले. 

साईनगर सोलापूर येथील शरणाप्पा शिवराया हांडे, मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील धनाजी विष्णू गड्डे, अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव येथील अंकुश केराप्पा गरंडे आणि सोमानिंग श्रीमंत घोडके यांच्यासह अन्य एकाने, 

पंढरपूर तालुक्यातील माऊली हळणवर आणि सुभाष मस्के यांच्या अप प्रेरणेमुळे आपल्याला शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण करण्यात आली असे फिर्यादीत म्हटले आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या टेबल समोर असलेल्या खुर्च्या फेकून देण्यात आल्या

 तसेच खिडक्यांच्या काचांची तोडफोड करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या फलकावर देखील शाई फेकण्यात आली. त्यामुळे शासकीय मालमत्तेचे सुमारे पन्नास ते साठ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे देखील फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.  

या प्रकरणी सदर बजार पोलिसांनी चौघांना अटक केली असून अन्य तिघांचा शोध पोलीस घेत आहेत. पंढरपूर तालुक्यातील माऊली हळणवर, सुभाष मस्के यांच्यासह आणखी एक अनोळखी अशा सात जणांच्या विरोधात, शासकीय कामात अडथळा आणून, शासकीय कर्मचाऱ्यास शिवीगाळ, मारहाण, दमदाटी केली

 तसेच सरकारी मालमत्तेचे नुकसान केले यासह तब्बल बारा कलमानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज सोमवारी ही घटना घडली असून अटक केलेल्यांना उद्या मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.  

या घटनेतील चौघांना अटक झाली असली तरी तिघे जण अजून पोलिसांच्या हाती लागले नाहीत, या तिघांचाही शोध सदर बझार पोलीस घेत आहेत, अचानक घडलेल्या या घटनेमुळे जिल्हा परिषद आवारात एकच खळबळ उडाली होती.

Post a Comment

0 Comments