google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 'डीजे'ला सोलापुरात 'नो एन्ट्री'! गणेशोत्सवात ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी असणार नाकेबंदी; आज पोलिस आयुक्तालयात बैठक

Breaking News

'डीजे'ला सोलापुरात 'नो एन्ट्री'! गणेशोत्सवात ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी असणार नाकेबंदी; आज पोलिस आयुक्तालयात बैठक

 'डीजे'ला सोलापुरात 'नो एन्ट्री'! गणेशोत्सवात ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी असणार नाकेबंदी; आज पोलिस आयुक्तालयात बैठक


सोलापूर :- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरात आवाजाची मर्यादा कोणालाही ओलांडता येणार नाही. त्यातून ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, हृदयविकाराचे रुग्ण, यांना त्रास होतो.

 या पार्श्वभूमीवर, आता आगामी गणेशोत्सव शांततेत व पारंपारिक वाद्यांच्या गजरात आनंदात साजरा करता यावा म्हणून परजिल्ह्यातून शहरात येणारे डीजे पोलिसांकडून नाकाबंदी करून अडविले जाणार आहेत.

लाखो रुपयांचा खर्च करून मोठ्या आवाजाची वाद्ये लावली जातात. आनंदाच्या उत्सवात अनेकांना त्या आवाजाचा नाहक त्रास सहन करावा लागतो. हॉस्पिटल, शाळा, रहिवासी परिसराचा कोणताही विचार न करता डीजे लावला जातो.

 आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी पुढाकार घेऊन 'डीजेमुक्ती'चा संकल्प करून नवा आदर्श निर्माण करायला हवा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दरम्यान, यंदा शहरात येणाऱ्या प्रवेशद्वारावर पोलिसांची नाकाबंदी असण्याची शक्यता असून त्यादृष्टिने नियोजन केले जात आहे. दुसरीकडे आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या मंडळांवर देखील गुन्हे दाखल होवू शकतात. त्यामुळे सर्व मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपून

 विधायक उपक्रम राबवावेत. महिला, तरुण, लहान मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करून सामाजिक एकोपा घट्ट करावा आणि लेझीम, ढोल अशा वाद्यांच्या गजरात गणरायाचे स्वागत करावे असेही आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

गणेशोत्सव मंडळांसह शांतता कमिटीची आज बैठक

१९ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवासंदर्भात उद्या (मंगळवारी) सकाळी ११ वाजता पोलिस आयुक्तालयात शांतता कमिटी व सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यावेळी पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांच्या वतीने डीजेमुक्त गणेशोत्सवासंदर्भात सूचना केल्या जातील. या बैठकीसाठी पोलिसांसमवेत महावितरण व महापालिकेचे अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.

नियम मोडल्यास कारवाई निश्चित

मोठ्या आवाजाच्या वाद्यांवर निर्बंध असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे सर्वांसाठी बंधनकारक आहे. कोणी आवाजाची मर्यादा ओलांडून ध्वनी प्रदूषण करीत असल्यास त्यांच्यावर कारवाई होईलच.

- डॉ. राजेंद्र माने, पोलिस आयुक्त, सोलापूर शहर

Post a Comment

0 Comments