ब्रेकिंग न्यूज...सोलापूर जिल्हा परिषद कर्मचारी संघटना एकवटल्या!
आंदोलनकर्त्यांचा निषेध ; कामकाज बंद ठेवण्याचा इशारा
पंढरपूर (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज ) सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या कार्यालयाची तोडफोडी नंतर सर्व कर्मचारी संघटना एकवटल्या आहेत.
सायंकाळी पाच सुमारास मुख्यालय परिसरात कर्मचारी एकत्रीत तोडी फोडीच्या घटनेचा निषेध व्यक्त केला.अचानकपणे तोडफोड केल्याने कर्मचारीवर्गात पडसाद उमटले आहेत.
सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कार्यालयीन तोडफोड करणाऱ्यावर जो पर्यंत फौजदारी कारवाई होत नाही तो पर्यंत मुख्यालयसह ११ पंचायात समितीचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्धार कर्मचारी संघटनेकडून करण्यात आला.
झेडपी बिंदू नामावली धनगर समाजाच्या साडेतीन टक्के आरक्षणानुसार शिक्षक भरती व्हावी या मागणीसाठी धनगर समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या कार्यालयाची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली यामध्ये अनेक खुर्च्या मोडले आहेत
खिडक्याच्या त्याचा फोडल्या आहेत. हा हल्ला म्हणजे आमच्या कुटुंबप्रमुखाच्या थेट खुर्चीवर हल्ला आहे. यापुढे सोलापूर झेडपी मध्ये अशी कोणतीही घटना घडू नये अशी अपेक्षा व्यक्त करत गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करावी अन्यथा अकरा पंचायत समित्या उघडणार नाहीत असा इशारा देण्यात आला.
दरम्यान, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील , समाजकल्याण धिकारी सुनिल खमितकर यांनी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला एकमुखी पाठिंबा दिला.
यावेळी कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजेश देशपांडे, युनियनचे राज्यसरचिटणीस विवेक लिंगराज , मराठा सेवा संघ कर्मचारी संघटना अध्यक्ष अविनाश गोडसे , आरोग्य संघटनेचे समीर शेख, बहूजन कर्मचारी संघटना अध्यक्ष गिरीष जाधव ,
कंत्राटी कर्मचारी संघटना अध्यक्ष सचिन जाधव, कास्ट्राईब कर्मचारी संघटना सचिव संजय कांबळे , यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.सिईओ मनिषा आव्हाळे यांनी दिले कामांस प्राध्यान्य .!
सीईओ यांच्या कार्यालयाची काही व्यक्तींनी तोडफोड केल्यानंतर कर्तव्यदक्ष सीईओ मनिषा आव्हाळे यांनी गटविकास अधिकारी व विभाग प्रमुख यांची बैठक घेऊन कामास प्राधान्य दिले. घरकुल योजना, प्राथमिक शिक्षक यांचे विविध प्रश्न, तालुका स्तरावरून प्राधान्याने सोडवून देणे बाबत सुचना दिल्या.
कार्यालयाची तोडफोड झालेली असताना थोडासा संयम ढळू न देता सीईओ आव्हाळे यांनी शांतपणे अधिकारी यांची बैठक घेऊन कामांना प्राध्यान्य दिले.
दीड महिनेत पुणे विभागात सोलापूर जिल्हा परिषदेस आघाडीवर ठेवण्यात आव्हाळे यांना यश आले आहे.
0 Comments