google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यात पोलिसांचा धाक होतोय कमी, शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच

Breaking News

सांगोला तालुक्यात पोलिसांचा धाक होतोय कमी, शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच

 सांगोला तालुक्यात पोलिसांचा धाक होतोय कमी, शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच


सांगोला (प्रतिनिधी):-सांगोला तालुक्यातील गावे व पोलिस यांचे प्रमाण पाहता सध्या सांगोला तालुक्याची विचित्र परिस्थिती आहे.पोलीसांची संख्या कमी असून पोलिसांचे संख्याबळ वाढवणे गरजेचे बनले असून चोऱ्या

घरफोड्या होऊ नयेत म्हणून आपले दागिने, पैसे यांची काळजी घेणे आपलीच जबाबदारी आहे.पोलिसांचा धाक कमी होतोय त्यामुळे सांगोला शहर व परिसरात चोरांचे सत्र सुरु असल्याची दबक्या आवाजात चर्चा ऐकावयास मिळत आहे.

सांगोला शहर व परिसरासह तालुक्यात गेल्या काही दिवसापासून दरदिवशी होणाऱ्या होणार्या चोर्याची घटनां पाहता चोरट्यांनाही पोलिसांचा धाक राहिला नसल्याचं दिसून येत आहे. तसेच चोरट्यांचा शोध घेण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे यातून पुन्हा

एकदा स्पष्ट झाले आहे.परिसरात वारंवार अशा चोरीच्या घटना घडत असल्याने परिसरातील नागरिकांसह महिला भयभीत झाल्या आहेत.अनेक चोरीचे गुन्हे दाखल असताना एकाही गुन्ह्याची अद्याप उकल झालेली नाही हे विशेष आहे. तालुक्यात अनेक छोट्यामोठ्या चोर्या

झाल्या मात्र पोलिसांचा तपास शून्यच दिसून येतो. चोरीच्या वाढत्या सत्रामुळे वाडी-वस्तीवरील नागरीक दहशतीखाली असून आपल्यामालमत्तांचे राखण करण्यासाठी रात्र जागून काढण्याची वेळ नागरिकांवर

आली आहे.सांगोला तालुक्यात सध्या सुरू असलेल्या चोऱ्यांचे सत्र थांबवण्याचे आव्हान पोलिसांसमोर असून. झालेल्या चोर्यांचा तपास लावून जनतेची टिकवण्याचे मोठे काम पोलिसांना करावे लागणार असल्याचे सूत्र नागरिकांमधून. बोलले जात आहे.

Post a Comment

0 Comments