टॅलेंट कट्टा या संस्थेतर्फे पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
शिरभावी :- टॅलेंट कट्टा या संस्थेतर्फे चालू वर्षात 2023 साली सामाजिक, साहित्य, कला, क्रीडा, शैक्षणिक, वैद्यकीय सेवा, सहकार, कामगार, पत्रकारिता, कृषी, राजकीय व विविध क्षेत्रात विशेष व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना “इंडियन टॅलेंट अवॉर्ड” या
पुरस्काराने पुण्यातील जाहीर कार्यक्रमांमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात येणार आहे. समाजासाठी झटणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांमधील व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
समाजातील विविध मान्यवरांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा , सर्व स्तरातील विकासाचे कार्य करण्याकरता त्यांना प्रोत्साहन मिळावे.
समाजाच्या उन्नतीसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या परंतु शासन व समाज यांच्याकडून कोणतीही अपेक्षा न ठेवणाऱ्या अनेक रत्नांचा शोध घेऊन त्यांना हे कार्य अधिक जोमाने करण्यासाठी प्रोत्साहित करता यावे
या उद्देशाने हा पुरस्कार वितरण सोहळा दरवर्षी आयोजित केला जातो. पुरस्कार प्रेरणा देतात, प्रेरणेने राष्ट्र मोठे होते ! या ब्रीदवाक्यानुसार हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे .
तरी इच्छुकांनी टॅलेंट कट्टा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. दिपक जाधव यांच्याशी 9511859047 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन टॅलेंट कट्टा या या संस्थेकडून करण्यात आले आहे.
पुण्यामध्ये रविवार दि. 8 ऑक्टोंबर, 2023 रोजी पत्रकार भवन सभागृह, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे या ठिकाणी होणाऱ्या या “इंडियन टॅलेंट अवॉर्ड” पुरस्कारसाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री आर्या घारे व अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहणार आहेत .
तसेच त्यासाठीचे प्रस्ताव 2 ऑक्टोंबर 2023 पर्यंत पाठवावे तसेच जास्तीत जास्त मान्यवरांनी आपले प्रस्ताव पाठवून या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments