सदगुरु हॉस्पिटलच्यावतीने मांजरी येथे मोफत सर्व रोग तपासणी व उपचार शिबीर संपन्न
सांगोला (प्रतिनिधी):- डॉ. धनंजय गावडे यांचे सदगुरु हॉस्पिटल आय. सी. यू. अॅन्ड ट्रॉमा केअर सेंटर सांगोला यांच्या वतीने गुरुवार दि. २१ सप्टेंबर रोजी मांजरी ता. सांगोला येथे मोफत तपासणी व उपचार शिबिर घेण्यात आले.
या मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीरासाठी मांजरी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितः होते. तसेच सदगुरु हॉस्पिटल आयसीयू अॅन्ड ट्रॉमा केअरमार्फत मोफत उपचार, आरोग्य तपासणी शिबिर व औषधे वाटप करण्यात आली.
डॉ. धनंजय गावडे यांच्या सदगुरु हॉस्पिटल आयसीयू अॅन्ड ट्रॉमा केअर सेंटर येथे हाडांचे सर्व ऑपरेशन व सांध्यातील तुटलेल्या दोरीवरील दुर्बिणीव्दारे सर्व शस्त्रक्रिया, आतड्यावरील
सर्व शस्त्रक्रिया, विषबाधा, पेशी कमी होणे, सर्पदंश, छातीला मार लागून त्यावरील शस्त्रक्रिया हे सर्वउपचार, आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
अंतर्गत पिवळे व केशरी रेशन कार्ड असणाऱ्या लाभार्थ्यांना योजने अंतर्गत मोफत उपचार केले जातात. या योजेअंतर्गत मोफत उपचाराचा सांगोला तालुक्यातील लाभाथ्र्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. धनंजय गावडे यांच्या कडून करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी सरपंच मंगल भुसे, सदस्या शहनाज तांबोळी, पत्रकार सचिन भुसे, कुमार कचरे, अमित तांबोळी, आरोग्य मित्र श्रीनाथ ठोकळे, बिरुदेव गडदे, विजय बंडगर, प्रविण बोराडे,
डॉ. महेश राऊत, विरेंद्र बनसोडे, अक्षय शेंडगे, सम्राट धनवडे, अलका लांडगे, मनिषा पाटील, आशाताई व सद्गुरु हॉस्पिटल आय. सी. यू. अॅन्ड ट्रॉमा केअर सेंटरचा स्टाफ उपस्थित होता.
0 Comments