google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील घटना...दुचाकीवरून जाताना पावसात दुचाकी घसरून अपघात; महिलेचा मृत्यू

Breaking News

सांगोला तालुक्यातील घटना...दुचाकीवरून जाताना पावसात दुचाकी घसरून अपघात; महिलेचा मृत्यू

 सांगोला तालुक्यातील घटना...दुचाकीवरून जाताना पावसात दुचाकी घसरून अपघात; महिलेचा मृत्यू


सांगोला - गणपतीची आरती करणेसाठी दुचाकीवरून जाताना पावसात दुचाकी घसरून अपघातात गंभीर जख्मी झालेल्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला

 तर पतीवर सांगोल्यात खाजगी रुग्णालयात उपचार सुरूसांगोल्यात खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात गुरुवार २१ रोजी रात्री ९:३० च्या सुमारास अकोला ता सांगोला येथील लिगाडेमळा येथे घडला . 

सुषमा सचिन घोरपडे -३३ रा अकोला ता सांगोला असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबत, संदीप सिध्देश्वर शिंदे रा. अकोला यांनी खबर दिली असून पोलिसांनी अकस्मित मृत्यू नोंद केली आहे.

अकोला येथील सचिन घोरपडे व सुषमा घोरपडे पती-पत्नी मिळून गुरुवारी रात्री ९:३० च्या सुमारास दुचाकीवरून गणपतीची आरती करण्यासाठी अकोला (लिगाडे मळा) येथे निघाले होते

 त्यावेळी पाऊस चालू होता त्या पावसातच रोडवर त्यांची दुचाकी घसरून पडल्याने पती-पत्नी जखमी झाले नातेवाईकांनी दोघांना उपचार करता सांगोला येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले

 असता पत्नी सुषमा घोरपडे यांचा रात्री ११ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला तर सचिन घोरपडे यांच्यावर उपचार सुरू आहेत

Post a Comment

0 Comments