google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला येथील सदानंद मल्टीपर्पज हॉल आज सकाळी 11 वाजता स्व.आमदार गणपतरावजी देशमुख सांगोला तालुका भूषण पुरस्कार वितरणाचा दिमाखदार सोहळा

Breaking News

सांगोला येथील सदानंद मल्टीपर्पज हॉल आज सकाळी 11 वाजता स्व.आमदार गणपतरावजी देशमुख सांगोला तालुका भूषण पुरस्कार वितरणाचा दिमाखदार सोहळा

सांगोला येथील सदानंद मल्टीपर्पज हॉल आज सकाळी 11 वाजता


स्व.आमदार गणपतरावजी देशमुख सांगोला तालुका भूषण पुरस्कार वितरणाचा दिमाखदार सोहळा

सुशीलकुमारजी शिंदे यांच्या शुभहस्ते,पद्मश्री पोपटराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि राजेंद्र दादा पवार,डॉ. चंदा निंबकर,तुषार ठोंबरे,पोपटराव देशमुख आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार हा भव्य वितरण सोहळा कार्यक्रमाची लोकांमध्ये मोठी उत्सुकता

कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या जन्मशताब्दी वर्षात व पुण्यतिथीच्या दुसऱ्या दिवशीच प्रा.पी.सी. झपके यांना मिळणार पहिला जीवन गौरव पुरस्कार

शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे 

सांगोला (प्रतिनिधी) स्वर्गीय आमदार गणपतरावजी देशमुख सांगोला तालुका भूषण पुरस्कार-2023 व जीवन गौरव पुरस्कार-2023 या पहिल्या अत्यंत महत्वपूर्ण व नामांकित पुरस्कारांचा वितरण सोहळा आज रविवारी दि 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता 

सांगोला येथील सदानंद मल्टीपर्पज हॉल मिरज रोड सांगोला येथे संपन्न होणार असल्याची माहिती किसान आर्मी आणि वॉटर आर्मीचे नेते आणि सांगोला तालुका भूषण पुरस्कार समितीचे प्रमुख प्रफुल्ल भैय्या कदम यांनी दिली आहे.

माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमारजी शिंदे यांच्या शुभहस्ते व पद्मश्री पोपटराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमास बारामती ॲग्रोचे चेअरमन राजेंद्र पवार, केंद्रीय विज्ञान व औद्योगिक संस्थेच्या सदस्य व आंतरराष्ट्रीय पशुधन संशोधन संस्था नैरोबीच्या सदस्या डॉ. चंदा निंबकर,

 अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, पोपटराव देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे, जिल्हा कृषी अधिकारी दत्तात्रय  गावसाने,पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कृषि, क्रीडा,संशोधन, पर्यावरण,प्रशासन आदी विविध क्षेत्रात तालुक्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.

      स्वर्गीय आमदार गणपतरावजी देशमुख सांगोला तालुका जीवनगौरव पुरस्कार हा अत्यंत महत्त्वाचा, मानाचा आणि पहिला  जीवनगौरव पुरस्कार सांगोला नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गुरुवर्य प्रबुद्धचंद्र झपके सर यांना दिला जाणार आहे. 

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके  यांचे वडील स्व. कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या जन्मशताब्दी वर्षातच प्रा.झपके यांना जीवन गौरव पुरस्कार मिळणार असल्याने संपूर्ण तालुक्याचे आणि शिक्षणप्रेमीना या पुरस्कार वितरण समारंभाचे वेध लागले आहेत. 

तसेच तालुका भूषण पुरस्कारासाठी निवडलेल्या व्यक्ती व संस्था या  शोध पद्धतीने निवडल्यामुळे तालुक्यातून याबद्दल विशेष कौतुक होत असून या पुरस्काराची मोठी उत्सुकता लोकांना लागलेली आहे.

Post a Comment

0 Comments