वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयाचा वर्धापन दिन साजरा.
वर्धापन दिनानिमित्त प्रशालेत वृक्षारोपणाचा उपक्रम
सांगोला (प्रतिनिधी) शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयाचा 37 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे आशाताई सलगर ,माजी नगरसेवक किशोर बनसोडे ,सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे, संस्थाध्यक्षा श्रीमती कौशल्यादेवी शिंदे मॅडम ,सहसचिव विठ्ठलपंत शिंदे, सर ,प्रफुल्ल देशपांडे, ऐश्वर्या देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुरुवातीस संस्थेचे संस्थापक वामनराव शिंदे साहेब व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन वरील मान्यवरांच्या उपस्थिती करण्यात आले.
यावेळी प्रास्ताविकात मुख्याध्यापक रमेश पवार सर यांनी प्रशालेच्या कार्याचा आढावा सांगितला. यावेळी किशोर बनसोडे बापूसाहेब ठोकळे आशाताई सलगर या मान्यवरांनी शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केली.
यावेळी प्रशालेचा वर्धापन दिनानिमित्त प्रशालेच्या प्रांगणात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.वर्धापन दिनानिमित्त प्रशालेत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कुंभार सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशालेतील सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



0 Comments