चित्रपटसृष्टी हळहळली! सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी जीवन संपवलं
सिनेविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी स्वतःचं जीवन संपवलं आहे.
कर्जत येथील एन.डी. स्टुडिओमध्ये नितीन देसाई यांनी स्वतःचं आयुष्य संपवलं आहे.
नितीन देसाई यांच्या निधनाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. नितीन देसाई यांनी स्वतःचे जीवन संपवल्यानंतर पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
नितीन देसाई यांनी कोणतं पत्र लिहिलं आहे की नाही याची चौकशी पोलिस करत आहेत. कलाविश्वातील अत्यंत धक्कादायक
बातमी समोर येत आहे. कलाविश्वातील दिग्गज व्यक्तीने टोकाचा निर्णय घेतल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
नितीन देसाई यांनी स्वतः उभारलेल्या एन.डी. स्टुडिओमध्ये शेवटचा श्वास घेतला आहे. नितीन देसाई यांनी घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे सिनेविश्वाचं मोठं नुकसान झासं आहे.
चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याआधी नितिन देसाई यांनी मुंबईतल्या सर जे.जे. कलाविद्यालयातून प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण घेतले.
१९८७ पासून त्यांनी चित्रपट कारकीर्दीला सुरुवात केली. त्यानंतर नितीन देसाई यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही.


0 Comments