google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला युवक काँग्रेसच्या वतीने भिडेच्या वक्तव्याचा निषेध व तहसीलदारांना निवेदन

Breaking News

सांगोला युवक काँग्रेसच्या वतीने भिडेच्या वक्तव्याचा निषेध व तहसीलदारांना निवेदन

सांगोला युवक काँग्रेसच्या वतीने भिडेच्या वक्तव्याचा निषेध व तहसीलदारांना निवेदन


महापुरुषांबद्दल सतत अपमान कारक विधाने करून चर्चेत राहणारे भिडे गुरुजी यांनी नुकतेच भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल अपमान कारक व अतिशय खालच्या स्तरावरील वक्तव्य एका

 कार्यक्रमादरम्यान केले त्यांच्या या वक्तव्याचा संपूर्ण भारतामधून सर्वच राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळींनी जोरदार निषेध केलेला आहे  भिडेंच्या  याच वक्तव्याचा निषेध सांगोला युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आला.

सांगोला तालुका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. प्रबुद्धचंद्र झपके सर, युवक जिल्हाध्यक्ष सुनंजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सांगोला काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष श्री सुनील भोरे व सांगोला युवक काँग्रेसचे अध्यक्ष फिरोज मणेरी यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.

 यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समर्थनार्थ भिडेच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. तसेच भिडे सारख्या अनेक लोकांकडून कडून सतत देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील व इतर महापुरुषांबद्दल अपमान कारक वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.  

या प्रकाचे वक्तव्य करणाऱ्या व समाजात तेढ निर्माण करून पाहणाऱ्या लोकांना शासनाने कठोर शासन करावे व भविष्यकाळात अशा विकृती पुन्हा समाजामध्ये निर्माण होऊ नयेत यासाठी सांगोला युवक काँग्रेसच्या वतीने मा. तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

यावेळी सांगोला तालुका विधानसभा युवक अध्यक्ष श्री. अजित चव्हाण, सांगोला तालुका काँग्रेस युवक अध्यक्ष श्री. तुषार माने, सांगोला तालुका युवक उपाध्यक्ष श्री. काशिनाथ ढोले, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष श्री. रमेश पाटणे, मीडिया सेलचे 

 तालुकाध्यक्ष श्री. दत्तात्रय देशमुख, तालुका अध्यक्ष अभिषेक कांबळे, महिला आघाडीच्या मैनाताई बनसोडे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र कांबळे तसेच काँग्रेसचे सर्व तालुका व शहर पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments