वाढदिवसाला फक्त झाडे भेट द्या ; आनंदा माने यांचे आवाहन
सांगोला/प्रतिनिधी (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला)
सांगोला नगरपरिषदेचे माजी नगरसेवक तथा गटनेते आनंदा (भाऊ) माने यांचा वाढदिवस गुरूवार दि. ०३ ऑगस्ट रोजी असल्याने त्यांनी त्यांच्या सहकारी,
कार्यकर्ते, समर्थक, हितचिंतक यांना वाढदिवसानिमित्त हार, शाल, फेटे न आणता एक झाड भेट द्यावे, असे आवाहन आनंदा माने यांनी केले आहे.
आनंदा माने यांनी स्वतः अनेक सहकारी मित्र, कार्यकर्ते यांचे वाढदिवसानिमित्त व इतर माध्यमातून शहरामध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण करून त्या झाडांना पाण्याची सोय करून चांगल्या प्रकारे जगविली सुध्दा आहेत. त्यामुळे सांगोला शहर काही वर्षांमध्ये आपणाला भरपूर झाडे असणारे शहर दिसेल. यामुळेच आनंदा (भाऊ) माने यांना शहरातील हरितक्रांतीचे जनक म्हटले तरी वावगे ठरणार नसल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.


0 Comments